विवेकानंद विद्यालय चोपडा आयोजित पुस्तक मैत्री शिबीर संपन्न..

 विवेकानंद विद्यालय चोपडा आयोजित पुस्तक मैत्री शिबीर संपन्न

चोपडा,दि.१ (प्रतिनिधी): पुस्तके दाखविती आम्हा सुयशाचा मार्ग | पुस्तके देती आत्मविश्वास ||वाचनाची महती समर्पक शब्दांत सांगणाऱ्या या काव्यपंक्ती. मोबाईल आणि नविन तंत्रज्ञानाच्या युगासोबत वाचन संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजावा व वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने  विवेकानंद विद्यालयात इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी २५ डिसेंबर रोजी 'पुस्तक मैत्री शिबीर' संपन्न झाले. आई शारदादेवी व ग्रंथपूजनाने शिबीराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डाॅ विकास हरताळकर 

यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी  उपाध्यक्ष घनश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डाॅ विनीत हरताळकर, मुख्याध्यापक श्री. नरेंद्र भावे, मुख्याध्यापिका श्रीमती आशा चित्ते ,श्री.पवन लाठी, श्री. हेमराज पाटील व सौ. माधुरी हळपे आदी मान्यवर  उपस्थित होते.

शिबिराचे आयोजक श्री. संजय सोनवणे सर यांनी पुस्तके वाचूया,वाचन संस्कृती रुजवूयाचे प्रयोजन स्पष्ट केले. त्यानंतर डाॅ. विकास हरताळकर यांनी शिबिरातील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना  शुभेच्छा देऊन सांगितले की पुस्तके आपल्याला समृद्ध करतात. मुख्याध्यापक श्री. नरेंद्र भावे यांनी PPT द्वारे वाचन कौशल्याचे महत्त्व व्यक्त केले.

सकाळच्या सदरात 'पुस्तक वाचनाचे फायदे' यावर श्री. संजय बारी ( महिला मंडळ हायस्कूल), यांनी खेळातून सुरुवात केली. 'मी वाचलेली काही पुस्तके' यावर सौ. गायत्री शिंदे ( पंकज विद्यालय चोपडा)यांनी त्यांनी वाचलेल्या पुस्तकातील काही प्रसंग सांगून आपला आत्मविश्वास कसा वाढतो ते सहजरित्या पटवून दिले, तर ' कविता गाणी शिकवती आम्हा ' हा विषय घेऊन वेगवेगळ्या चाली लावून सौ. योगिता पाटील (प्र.वि.मं.चोपडा) यांनी मार्गदर्शन केले. संगितखूर्ची खेळाद्वारे पुस्तकाचे  कवी किंवा लेखक कोण हे श्री.अभिषेक शुक्ल यांनी  घेतले. नंतर सर्व विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. 

दुपारच्या सत्रात 'चला करुया पुस्तकांशी मैत्री- चला जाऊया पुस्तकांच्या नगरीत ' हा खेळ श्री. संजय सोनवणे यांनी प्रत्येक मुलाच्या हातात पुस्तकं देऊन खेळीमेळीच्या वातावरणात वाचन करून घेतले.  'मै तैयार हू' हे Motivational Song  श्री. राकेश विसपुते यांनी मुलांच्या हातात पुस्तके देऊन नृत्य करून घेतले व यातून आता वेगवेगळी पुस्तके वाचण्यासाठी मी तयार होईल असे प्रोत्साहन दिले. शिबिराच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाकडे आम्ही वळणार असा संकल्प घेऊन आपले मनोगते व्यक्त केली. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी हे शिबीर आयोजित केल्याबदल पालकांनी विवेकानंद परिवाराचे अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने