चोपडा तालुका व्यापारी महामंडळाच्या कार्याध्यक्षपदी दीपक राखेचा यांची स्तुत्य निवड
चोपडा दि.१८(प्रतिनिधी)तालुका व्यापारी महामंडळ अध्यक्ष अमृतभाई सचदेव यांचे नेतृत्वाखाली गेल्या 30 वर्षापासून व्यापारी हितासाठी काम करत आहे.महामंडळाचे पदाधिकाऱ्यांची छोटेखानी सभा अमृतभाईंच्या निवासस्थानी घेण्यात आली
मागील काही दिवसापासून महामंडळाचे कार्याध्यक्ष पद रिक्त होते त्यामुळे मंडळाचे वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक राखेचा यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली सूचक म्हणून अनिल वानखेडे व अनुमोदक म्हणून संजय कानडे हे होते
येणाऱ्या काळात व्यापारी हितासाठी अमृत भाई सचदेव यांचे नेतृत्वाखाली पदाला योग्य न्याय देण्याचे आश्वासन दीपक राखेचा यांनी दिले सभेचे सूत्रसंचालन सनी सचदेव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रवीण राखेचा यांनी मानले