नाताळ ख्रिसमसला ३२ वर्षांपासून "चर्च" वर विद्यूत रोषणाईचा झगमगाट करणारे दातृत्वशाली व्यक्तीमत्व अमळनेरचे प्रल्हाद बाविस्कर .. सर्व धर्म समभावचा नारा रुजविण्याचे महान कार्य सखाराम महाराजांचे सानिध्यात
चोपडा दि.२४(प्रतिनिधी)मनात कोणताही जाती व धर्म भेदभाव न ठेवता सलग ३२वर्षे ख्रिसमस च्या दिवशी चर्च ला मनमोहक रंगांच्या रोषणाईने ढवळून काढणारे व्यक्तीमत्व म्हणजे अमळनेर येथील प्रताप हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक श्री.प्रल्हाद रामदास बाविस्कर हे होय. ते ख्रिसमस नाताळ निमित्त न विसरता चर्च परिसर विद्यूत रोषणाईने झगमगाट करून सोडतात .
प्रल्हाद बाविस्कर हे संत सखाराम महाराज यांचे शिष्य असून त्यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर आहे .सखाराम महाराज जसे रथाला पहिली मोगरी लावण्यांचा मान मुस्लिम बांधवांना देतात तोच विचार प्रल्हाद बाविस्कर यांनी अंगिकारलाआहे. पिरबाबा ची यात्रा असो की ख्रिसमस ते तन मन धनाने योगदान देतात..
बौध्द पौर्णिमेला (पालखीला) बोरी नदी मध्ये वीस मंडप टाकुन भाविकांसाठी अन्न दानाचा भंडारा लावून भक्तांची सुधा शमविण्याचे अनोखे कार्य करतात.या समाजोपयोगी कार्यात हिंन्दु,मुस्लिम,बौध्द सर्व समाज बांधव आनंदाने एकत्रित येऊन सेवा बजावतात दरवर्षी वाल्मिकी जंयती ला सर्व समाज बांधवांसाठी महाप्रसादांची व्यवस्था करतात.आर.आर.फाऊंडेशनच्या माध्यमातून जवळपास 500 लोकांचे डोळे तपासणी करून मोफत चष्मे वाटप केले आहेत,अंपगाना सायकली वाटप, गरजू विद्यार्थींना मोफत वह्या,पेन,बॅग वाटप करण्यात ते पुढे आहेत.अनेक क्षेत्रातील गरजूंना मदतीचा हात ते देत असतात.आता ही जबाबदारी त्यांनी त्यांच्या मुलगा अजय प्रल्हाद बाविस्कर (पोलीस मुख्यालय जळगांव) व सुनबाई इंजिनियर सौ.स्वाती अजय बाविस्कर (कृष्णा कन्स्ट्रक्शन) यांचावर सोपवली आहे . या दातृत्वशाली कामास जवाई रामचंद सपकाळे (से.नृ.उपमुख्यापक) व मुलगी सौ.सुरेखा सपकाळे (शिक्षिका), अरुश्री हॉस्पिटलचे डॉ .परिक्षित बाविस्कर,जितेन्द्र सोनवणे (सा.बा.अमळनेर ),दत्तात्रेय सैंदाणे (पोलीस महासंचालक ऑफीस मुंबई),प्रविण सुर्यवंशी (मुंबई पोलीस),प्रा.डॉ.सुभाष महाजन ,दिनेश बिर्हाडे न.पा.अमळनेर,डॉ.विलास महाजन वैघकिय आधिकारी अमळनेर, श्री.सुनील बाविस्कर ,मधुकर सोनवणे,पत्रकार गौतम बिर्हाडे,चंद्रशेखर सुरवंशी,मनोज कोळी,अनिल चौधरी सोहम मंडप, आर.आर.फाऊंडेशन व कोळी पंचमंडळाचे योगदान लाभते.