चोपडा येथे भव्य कीर्तन सप्ताह

 चोपडा येथे भव्य कीर्तन सप्ताह

चोपडा,दि.१९(प्रतिनिधी) संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा तर्फे दिनांक 21 डिसेंबर ते दिनांक 28 डिसेंबर 2024 या कालावधीत रोज रात्री आठ ते दहा या वेळेत कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 

हरिभक्त परायण बापू महाराज लासुर, ह भ प गोपीचंद महाराज सुंदरगडी चोपडा, ह भ प श्री तेजस पाटील महाराज इंजिनीयर पुणे यांचे नियोजनानुसार 21 डिसेंबर रोजी ह भ प प्रदीप महाराज मराठे बोरगावकर, 22 डिसेंबर 2024 रविवार रोजी ह भ प कुणाल महाराज धरणगावकर, 23 डिसेंबर श्रीकांत महाराज खडकेकर ,24 डिसेंबर 2024 रोजी ह भ प राहुल महाराज दोनगावकर, 25 डिसेंबर 2024 रोजी ह भ प रामेश्वर महाराज श्रीक्षेत्र नागेश्वर, 26 डिसेंबर 2024 गुरुवार रोजी हभप दत्तात्रय महाराज साबळे आळंदीकर, 27 डिसेंबर 2024 शुक्रवार रोजी ह भ प श्याम महाराज शास्त्री पिंपळगाव, 28 डिसेंबर 2024 शनिवार ह भ प बापू महाराज लासुर यांची कीर्तने ठेवण्यात आली आहेत.  गायनाचार्य म्हणून ह भ प प्रकाश महाराज लासुर, ह भ प अविनाश महाराज लासुर, ह भ प सोहम महाराज चौधरी लासुर, हभप पवन महाराज लासुर, ह भ प सोहम महाराज लासुर हे असून, मृदुंगाचार्य हभप रोहन महाराज लासुर, विणेकरी ह भ प छोटू महाराज लासुर यांची साथ लाभणार आहे. रोज सकाळी पाच ते सहा काकड आरती, संध्याकाळी पाच ते सहा हरिपाठ व रोज रात्री आठ ते दहा कीर्तन अशा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी नाटेश्वर साऊंड सिस्टिम लासुर यासह पंचक्रोशीतील भजनी मंडळ, संत मंडळी तालुक्यातील तालुक्यातील गुणीजन परिश्रम घेत आहेत .संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर तेली समाज मंगल कार्यालय श्रीराम नगर चोपडा येथे होणाऱ्या कीर्तन सप्ताह ला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री के.डी. चौधरी, उपाध्यक्ष श्री  टी. एम. चौधरी, सचिव भिका चौधरी, राजेंद्र गणपत चौधरी, नारायण पंडित चौधरी, देवकांत के चौधरी, प्रशांत चौधरी, शशिकांत चौधरी, रवींद्र चौधरी आणि अनेक कार्यकर्त्यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने