जळगाव जिल्हा माहेश्वरी महिला संघटनेच्या महिला सशक्तीकरण समिती अंतर्गत स्वयंसिद्धा उद्योग मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
♦️ एकाच छताखाली विविध वस्तूंचा स्टाॕल लागल्याने ग्राहक खुष
♦️बेस्ट स्टॉल प्रथम प्राईज नम्रता काबरा तर द्वितीय प्राईज वनिता सोनी यांनी पटकाविले.
♦️प्रायोजक होते रतनलालजी बाफना व बुलडाणा अर्बन बँक तर सहप्रायोजक पारस राका, भुषण थेपडे, नरेंद्र तोतला, किशोरजी महाजन श्री नारायण एंटरप्रायजेस
जळगांव दि.२०(प्रतिनिधी)जिल्हा माहेश्वरी महिला संघटनेच्या महिला सशक्तीकरण समिती अंतर्गत स्वयंसिद्धा उद्योग मेळाव्याचे उद्घाटन प्रदेश सह सचिव राधाजी झंवर ह्यांच्या शूभ हस्ते झाले तर प्रमुख अतिथी म्हणून स्वयंसिद्धा समिती प्रमुख रेखाजी मुंदडा (धुळे) तर सह संयोजिका शारदाजी कासट, बुलढाणा बँकेचे पवार व उपाध्यक्ष केदारजी मुंदडा व महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या. मेळाव्यात सर्व प्रकारचे उपयुक्त सामान महिलांना एकाच छताखाली ग्राहकांना कसे मिळेल असा प्रयत्न केला गेला महिलांना सशक्त बनवण्यासाठी विविध कलात्मक वस्तूंना मार्केट उपलब्ध करून दिले, विविध प्रकारचे हॅन्डमेड ज्वेलरी , आकर्षक स्वेटर, शाली व कपडे, सजावटीचे साहित्य, खान्देशी भरीत भाकरी सोबत अनेक खाण्याचे स्टॉल होते. जिल्ह्यासहित खंडवा, औरंगाबाद, नाशिक, भुसावळ, अमळनेरसहित बचतगटांच्या भगिनीचेही स्टॉल होते.
सहभागी महिलांसाठी विविध बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. व येणाऱ्या ग्राहकांसाठी लकी ड्रा चे ६० प्राईज व बंपर प्राईजमध्ये मिक्सर देण्यात आले. सर्व स्टॉलधारक, कार्यकर्त व अतिथीना शारदाजी कासट यांचेकडून रेडीएशन चीप भेट देण्यात आली तर गणप्पा डेअरीकडून फ्री लस्सी वाटप आली.
बेस्ट स्टॉल प्रथम प्राईज नम्रता काबरा तर द्वितीय प्राईज वनिता सोनी यांनी पटकाविले.तसेच
बेस्ट क्रिएटीव्हीटी अवॉर्ड प्रथम प्राईज दिक्षा राठी,द्वितीय प्राईज राधा बिर्ला ,बेस्ट फुड स्टॉल प्रथम प्राईज प्रमिला कुरकुरे, द्वितीय बक्षीस-रूपाली पाटील व निता किथानी यांना नयनतारा बाफना यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या मेळाव्यास प्रदेशचे उपाध्यक्ष केदार मुंडा, जिलाध्यक्ष बी. जे. लाठी स सचिव योगेश कलंत्री, रमण लाहोटी, मदनजी लाठी स्मिताताई भोळे, संगिता बियाणी यांनी सदिच्छा भेट दिली.
या कार्यक्रमाचे प्रायोजक रतनलालजी बाफना एवंम् बुलडाणा अर्बन बँक होते. पारस राका, भुषण थेपडे, नरेंद्र तोतला, किशोरजी महाजन श्री नारायण एंटरप्रायजेस हे सहप्रायोजक होते.
कार्यक्रमासाठी उषा कासट, डॉ. संगिता चांडक, समिती प्रमुख ममता राठी, सहप्रमुख सुषमा झंवर, अर्चना मणियार, निल्लीमा माहेश्वरी, चित्रा मालपाणी, डॉ. पूनम मंत्री, ममता काबरा, सुधा काबरा, ललिता झंवर, अनिता सोमाणी यांनी विशेष सहकार्य केले. माजी प्रदेश अध्यक्ष ज्योत्सना लाहोटी यांचे मार्गदर्शन लाभले तरअध्यक्ष सुमती नवाल व सचिव मनिषा तोतला यांनी आभार मानले.