कॅबिनेट मंत्री श्री गुलाबरावजी पाटील यांचा राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे जाहीर सत्कार
धरणगाव दि.२०(प्रतिनिधी) माजी मंत्री तथा जळगाव जिल्ह्याची बुलंद तोफ म्हणून ओळख असलेल्या श्री. गुलाबरावजी पाटील यांची कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय अपंग विकास महासंघा कडून त्यांचा ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत जोरदार स्वागत करून जाहीर सत्कार करण्यात आला . यावेळी धरणगाव तालुक्यातील दिव्यांग बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते .
नामदार गुलाबराव पाटील यांचे विश्रामगृहावर जाऊन राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी तालुका अध्यक्ष संजय पाटील , राजू चौधरी , प्रमोद सुतारे , रवींद्र काबरे , देवा महाजन, व तसेच रमेश चौधरी, जगतराव पाटील, लालचंद पाटील, बाबूलाल पटेल, लीलाधर नन्नवरे, आनंद पाटील , बाळा, दादू , जितेंद्र पाटील, कैलास पाटील यांच्यासह दिव्यांना बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.