साने गुरुजी विद्यामंदिर अमळनेर येथे बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत शपथ
अमळनेर दि.११(प्रतिनिधी)- दिनांक ११ डिसेंबर २०२४ रोजी साने गुरुजी विद्यामंदिर अमळनेर येथे "एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन",आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर", यूनिसेफ एस.बी.सी 3 द्वारा बालविवाह निर्मुलन ची शपथ घेण्यात आली. तसेच गावात प्रभात फेरी तसेच समाजकार्य महाविद्यालय अमळनेर चे राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सागर कोळी,अन्वर फकीर,कीर्ती सोनवणे,अनुजा पाटील,रत्ना खैरनार,मयुरी पाटील या विद्यार्थ्यांनी पथनाट्य च्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.संजीव पाटील, उपमुख्याध्यापक मा.योगेश मोरे,तसेच या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.भारती पाटील ,कार्यकारी संचालक रेणू प्रसाद ,प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, मोहिनी धनगर ,दिपक विश्वेश्वर, यूनिसेफ एस.बी.सी 3 जिल्हा प्रकल्प समन्वयक रुचिका इंगळे जळगाव, व योगिता चौधरी संरक्षण अधिकारी अमळनेर तसेच क्षेत्र समन्वयक प्रा.डॉ.जगदीश सोनवणे, व सुत्रसंचलन किशोर अहिराव यांनी केले सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
