चोपडा येथे संगीतमय दिव्य शिवमहापुराण कथा

 चोपडा येथे संगीतमय दिव्य शिवमहापुराण कथा 

चोपडा,दि.१८(प्रतिनिधी) -श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा या संस्थेच्या वतीने दिनांक 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2024 या कालावधीत हरिद्वार निवासी आचार्य पंडित मनोज जी भास्कर महाराज यांच्या अमृतवाणी द्वारे संगीतमय दिव्य श्री शिवमहापुराण  कथा रोज दुपारी 2:00 ते 5:00 या वेळेत संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर, तेली समाज मंगल कार्यालय श्रीराम नगर चोपडा येथे आयोजित करण्यात आली  आहे.

स्व. पार्वताबाई डुमन चौधरी व स्व. सौ सरलाबाई कालिदास चौधरी यांचे स्मृती प्रित्यर्थ सौ. सोनल नरेश  चौधरी नाशिक, सौ. धनश्री देवकांत चौधरी चोपडा, सौ. प्रिया सूर्यकांत चौधरी चोपडा यांच्या सौजन्याने भव्य दिव्य शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवमहापुराण कथेचा आनंद घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री के.डी. चौधरी, उपाध्यक्ष टी. एम. चौधरी संस्थेचे विश्वस्त, संचालक मंडळ व समाज बांधवांनी केले आहे. दि. 27 डिसेंबर 2024 रोजी स. 9:00 वा. कथेचा विश्राम होणार असून त्यावेळी स. 11 ते दु. 2:00 या कालावधीत महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने