श्री नागेश्वर बाबा गोल मंदिर येथे ६ रोजी त्रिशुल शोभायात्रा व रोपण विधी सोहळा

 

श्री नागेश्वर बाबा गोल मंदिर येथे ६ रोजी त्रिशुल शोभायात्रा व रोपण विधी सोहळा

चोपडा दि.५(प्रतिनिधी) : चोपडा शहराचे वैभव व पुरातन मंदिर श्री नागेश्वर बाबा गोल मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. त्या मंदिराच्या परिसरात २१ फुटाचा त्रिशुल रोपण विधी दि. ६/१२/२०२४ शुक्रवार रोजी अभिजीत मुहूर्तावर  मार्गशिर्ष शु।। पंचमी च्या शुभ मुहूर्तावर करण्यात येत आहे. 

सदरील त्रिशुलची भव्य शोभायात्रा  सकाळी ९.३० वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक पासुन मेनरोड मार्गे गोलमंदिर पर्यंत निघणार आहे.हे २१फुट उंचीचे त्रिशूळ महावीर नगरातील  रहिवासी दातृत्वशाली व्यक्तीमत्व श्री. राजेंद्र यशवंतराव बडगुजर यांनी  गोल मंदिर नागेश्वर बाबा मंदिरास मोठ्या श्रद्धेने   सप्रेम भेट दिले आहे . त्यामुळे त्यांचे कौतुक केले आहे.

 या शोभायात्रेत श्री नागेश्वर बाबा गोलमंदिर समिती,श्री समस्त बडगुजर समाज, श्री रथगल्ली मित्र मंडळ, श्री गोल मंदिर मित्र मंडळ, श्री मोठा भोईवाडा मित्र मंडळ, श्री बालाजी मंदिर संस्थान, श्री एकवीरा माता मंदिर संस्थान, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राजे संभाजी चौक मित्र मंडळ, बोल बजरंग बहु. संस्था, रायबा गृप, महावीर नगर मित्र मंडळ, सर्व नवरात्र व गणेश मंडळ सहभागी होणार आहेत.तरी यात्रेत  मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने