पुणे येथील डॉ. सागर देशपांडे यांचे "आदर्शाच्या शोधात" या विषयावर ७ डिसेंबरला विवेकानंद विद्यालयात व्याख्यान
चोपडा दि.४( प्रतिनिधी ) येथील चोपडा शिक्षण मंडळाचे सेक्रेटरी तथा माजी मुख्याध्यापक यशवंत गोविंद हरताळकर उर्फ नानासाहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे 7 डिसेंबर 2024 शनिवार रोजी दुपारी 4 : 30 वाजता विवेकानंद विद्यालय यावल रोड येथे पुणे येथील सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक आणि पत्रकार जडण-घडण मासिकाचे मुख्य संपादक डॉक्टर सागर सुधाकर देशपांडे यांचे "आदर्शाच्या शोधात " या विषयावर व्याख्यान आयोजित केलेले आहे.
तरी रसिक श्रोत्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक डॉ. विकास हरताळकर. हरताळकर हॉस्पिटल व परिवार,विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र चोपडा यांनी केले आहे.