जन्मदाता झाला सैतान.. कुऱ्हाडीने दोघं मुलांना केले ठार..पत्नी गंभीर जखमी : चारित्राच्या संशयातून घडले हत्याकांड !
चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील गौऱ्यापाडा येथील संजय नानसिंग पावरा (२३) याने चारित्र्याच्या संशयावरून संतापाच्या भरात स्वतःच्या दोन चिमुकल्यांना कुऱ्हाडीने वार करून ठार केले; सुदैवाने १९ वर्षीय पत्नी बचावली पण ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या सीमेवरील देवळी गावी घडली.
मृतांमध्ये पाच वर्षांचा मुलगा डेव्हिड आणि तीन वर्षाची मुलगी डिंपल हिचा समावेश आहे.पत्नीसोबत झालेल्या भांडणात त्याने कुऱ्हाडीचे वार करून दोन्ही मुलांना डेव्हिड आणि डिम्पल जागीच ठार केले. पत्नीच्या डोक्यावरही कुऱ्हाडीने पाच ते सहा वार केले. त्यामुळे ती देखील गंभीर जखमी असल्याचे कळतेय.
लोकांनी संजय पावरा आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी मध्य प्रदेशातील वरला पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंभीर जखमी पत्नीला मेंदूपर्यंत मार लागला असल्याने तिच्यावर धुळे येथील शासकीय रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती मृत्यूशी झुंज देत आहे.