नाशिकला योग क्रीडा प्रबोधिनी महाविद्यालयात पदवीदान समारंभ उत्साहात
नाशिक दि .२१ नोव्हेंबर (प्रतिनिधी) : योगक्रीडा प्रबोधिनी व निसर्गयोगी योग व निसर्गोपचार केंद्रामार्फत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय अंतर्गत (एम ए योगशास्त्र ) अभ्यासक्रमाच्या प्रथम बॅच २०२०-२०२२ आणि दुसरी बॅच २०२१-२०२३ ह्या दोन्ही बॅच चा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात मोहनलाल बँक्वेट हॉल गंगापूर रोड येथे नुकताच पार पडला . या कार्यक्रमासाठी एस. एम. बी टी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य ,डॉ प्रदीप .आर .भाबड सर हे प्रमुख पाहुणे तसेच योगक्रीडा प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष डॉ . प्रेमचंद जैन सर व योगक्रीडा प्रबोधिनी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा . पिराजी नरवाडे सर हे व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पदवीदान करण्यात आले . हा कार्यक्रम एकूण १०० उपस्थितांमध्ये पार पडला त्यामध्ये एकूण ६५ विद्यार्थी होते . उत्तीर्ण साधकांना पदवी प्रमाणपत्र , स्टोल देऊन सन्मानित करण्यात आले . तसेच पहिल्या आणि दुसऱ्या बॅच मधील पहिल्या ५ साधकांना मेडल ,पदवीप्रमाणपत्र आणि स्टोल देऊन सन्मानित करण्यात आले ,
पहिली बॅच अनुक्रमे
१) डॉ स्मिता भांबेरे ( गुण -१६३३)
२) डॉ स्वप्नजा कळमकर
(गुण -१६३०)
३) डॉ वनश्री पलोड
( गुण -१६२४)
४) प्रीती नरवाडे ( गुण - १६११)
५) राखी शेंडे (गुण १६०८)
दुसरी बॅच अनुक्रमे
१) डॉ कविता पवार
२) डॉ प्रज्ञा कुलकर्णी
३) भावना वाघ
४) डॉ रचना आवारे
५) स्नेहल पाटील
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ प्रदीप भाबड सरांचा शाल ,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन डॉ प्रेमचंद जैन सरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच प्रा . पिराजी नरवाडे सरांचा सन्मान डॉ प्रेमचंद जैन सरांच्या हस्ते व डॉ प्रेमचंद जैन सरांचा सन्मान प्रा पिराजी नरवाडे सरांच्या हस्ते करण्यात आला . आणि या कार्यक्रमाप्रसंगी प्रा डॉ किरण जैन , प्रा. रेवती नरवाडे , प्रा . संगिता अंबोरे इ . प्राध्यापकांचा सन्मान डॉ प्रेमचंद जैन सरांच्या हस्ते करण्यात आला .