जिल्ह्यात सूक्ष्म नियोजनामुळे मतदान सुरळीत; मतदान यंत्रात नगण्य त्रुटी
▪ मतदान केंद्रावरील टीमला प्रत्येक टप्यासाठी पाच वेळा मार्गदर्शक संदेश
▪ अकरा विधानसभेसाठी 11,762 ईव्हीएम त्यातील फक्त्त 79 बदलावे लागले
▪ मतदार यादी अपडेटमुळे किरकोळ तक्रारी ; सी - व्हिझीलच्या 275 तक्रारी निकाली
जळगाव दि.22 ( प्रतिनिधी ) जिल्ह्यात निवडणूक यंत्रणेनी सूक्ष्म नियोजन केल्यामुळे मतदान सुरळीत पार पडले. जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघात एकूण 11,762 बॅलेट युनिट वापरण्यात आले त्यातील फक्त्त 79 यंत्र बदलावी लागली. मतदार यादी अपडेटमुळे यावेळी एकही तक्तार आली नाही अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
▪️*नियोजनासाठी पाच संदेश ठरले प्रभावी*
मतदान केंद्रावरील टीमला जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून वेगवेगळ्या टप्यात पाच मेसेज देण्यात आले.
त्यातला पहिला संदेश सकाळी 90 मिनिटापूर्वी करायच्या कामाच्या सूचना त्यात मतदान प्रतिनिधीची नियुक्तीपत्र, त्यांची मूळ स्वाक्षरी व इपिकची खात्री करूनच त्यांना प्रवेश द्यावा. सकाळी 90 मिनिटच्या अगोदर
बॅलेट युनिट जोडून ठेवावे. 90 मिनिटे अगोदर अभिरूप मतदान सुरु करावे. मतदान सुरु झाल्यानंतर करावयाच्या कामाच्या सूचना त्यात स्थलांतरीत व मयत मतदारांची यादीमध्ये नाव असलेल्या मतदाराची ओळख स्वतः मतदान केंद्राध्यक्ष यांनी करून घ्यावी. सायंकाळी 6 वाजता उपस्थित मतदारांना उलट्या क्रमाने चिठ्या द्याव्यात.
मतदार यादी अपडेटमुळे नगण्य तक्रारी
मतदार यादीत स्थलांतरीत आणि मयत यांचे नाव वगळून 1 लाख 43 हजार नवीन मतदाराची नोंद करण्यात आली. त्यामुळे फारशा तक्रारी आल्या नसल्याचे निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मतदान केंद्रावर सुविधा
मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अधिकाधिक सुविधा देण्यात आल्या होत्या. आरोग्याच्या सुविधेमुळे 25 ठिकाणी रुग्णावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
अल्पबचत भवन मधील वेबकास्टिंगवरून नियंत्रण
11 विधानसभा मतदार संघात एकूण 3683 मतदान केंद्र पैकी 2965 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात आले, म्हणजे अर्ध्यापेक्षा अधिक मतदान केंद्रातून वेबकास्टिंग करण्यात आली. राज्यात सर्वाधिक वेबकास्टिंग जळगाव जिल्ह्यात करण्यात आली. याचे नियंत्रण अल्पबचत भवन मध्ये करण्यात आले. या ठिकाणी जिल्हानिवडणूक अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, निवडणूक आयोगाच्या सामान्य निरीक्षक यांचे बारकाईने लक्ष देऊन त्रुटी दुर केल्या.
सी व्हिजील अँपवरील संपूर्ण तक्रारीचे निवारण
या ॲपवर एकूण 275 तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या तर जिल्ह्यातील 1950 कॉल सेंटरवर 879 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आचारसंहिता लागू झाल्यापासून आचारसंहिता भंगाशी संबंधित तक्रारी करण्यासाठी सी व्हिजिल अँप कार्यान्वित करण्यात आले होते. या ॲप वर विविध प्रकारच्या आचारसंहिता भंगाशी संबंधित तक्रारी प्राप्त होत होत्या. जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातून एकूण 275 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारी तात्काळ सोडविण्यात आल्या. सी व्हिजिल या ॲपवर प्राप्त तक्रारींमध्ये चोपडा विधानसभा मतदारसंघातून 04, रावेर विधानसभा मतदार संघातून 01, भुसावळ विधानसभा मतदारसंघातून 05, जळगांव शहर विधानसभा मतदार संघातून 21, जळगाव ग्रामीण मतदार संघातून 04, अमळनेर मतदार संघातून 14, चाळीसगाव मतदार संघातून 71, पाचोरा विधानसभा मतदारसंघातून 49, जामनेर विधानसभा मतदारसंघातून 10, तर सर्वाधिक मुक्ताईनगर मतदारसंघातून 89 अशा एकूण 268 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीचे दखल घेत तात्काळ या सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्याआहेत. जळगाव जिल्ह्यात आचारसंहिता भंगासदर्भात तसेच निवडणुकीच्या कालावधीत येणाऱ्या अडचणी संदर्भात तक्रारी करण्यासाठी अकरा विधानसभा मतदारसंघातून 1950 हा नंबर देण्यात आला होता. यावर मतदानाच्या दिवसापर्यंत 879 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारींचे दखल घेऊन या तक्रारींचे देखील निराकरण जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
000000