नामदार श्री. गिरीशजी महाजन व केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे ह्यांचे महायुतीचे उमेदवार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना निवडून आणण्याचे आवाहन..

 नामदार श्री. गिरीशजी महाजन व केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे ह्यांचे महायुतीचे उमेदवार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना निवडून आणण्याचे आवाहन..

♦️चोपडा शहर व ग्रामिण मंडल पदाधिकारी  संघटनात्मक बैठकीत सूचना.. 

♦️शिंपी समाजाचा प्रा.चंद्रकांत सोनवणे यांना पाठिंबा जाहीर 


चोपडा दि.१६(प्रतिनिधी) दि. १५- ११- २०२४  शुक्रवार रोजी  दुपारी  ४.०० वाजता हाॅटेल योगानंद हाॅल  चोपडा येथे येथे  राज्याचे संकटमोचक तथा ना. श्री. गिरीशभाऊ महाजन  तसेच केद्रींय राज्यमंत्री ना. श्रीमती रक्षाताई खडसे यांनी चोपडा विधानसभा निवडणूक २०२४  प्रचार नियोजन संदर्भात  भाजपा  शहर व ग्रामिण मंडल पदाधिकार्‍याची संघटनात्मक बैठक संपन्न झाली.   प्रास्ताविक तालुकाध्यक्ष श्री. चंद्रशेखरदादा पाटील यांनी केले, उपस्थित पदाधिकार्‍यांनी ना. श्री.गिरीशजी महाजन साहेब, व केंद्रीय राज्यमंत्री ना. श्रीमती रक्षाताई खडसे यांना मागील दहा वर्षाच्या कार्यकाळातील अनुभव घेतलेल्या घडामोळी कथन केल्यात.

  ना.श्री.गिरीशजी महाजन  यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांच्या सर्व  अडचणी, समस्या ऐकूण घेतल्यात, व  राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोबत राहुन महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री.चंद्रकांतजी सोनवणे यांना विजयी करण्यासाठी आवाहन केले,

     तसेच केंद्रीय राज्यमंत्री ना. श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्र व राज्यातील डबल इंजिन सरकारच्या सरकारमुळे विकासकामे जास्तीत जास्त करण्यासाठी महायुतीचे उमेदवार आण्णासो श्री. चंद्रकांतजी सोनवणे यांना विजयासाठी उपस्थितांना आवाहन केले,

        यावेळी  महायुतीचे अधिकृत उमेदवार आण्णासो चंद्रकांतजी सोनवणे यांनी उपस्थित सर्व पदाधिकार्‍यांना निवडणूकीच्या प्रचारासाठी आवाहन केले व सर्वांना सोबत घेऊन पुढील वाटचाल करणार अशी ग्वाही ना. श्री.गिरीशजी महाजन  व केंद्रीय राज्यमंत्री ना.श्रीमती रक्षाताई खडसे जेष्ठ पदाधिकार्‍यांसमोर दिली,

    सदर संघटनात्मक बैठकीसाठी मंचावर  जेष्ठनेते आत्मारामभाऊ माळके, मुलुख मैदान तोफ श्री. शांतारामआबा पाटील, चोपडा विधानसभा मतदार संघ क्षेत्र प्रमुख श्री. गोविंदजी रतन सैंदाणे,  तालुकाध्यक्ष श्री. चंद्रशेखरदादा पाटील, शहराध्यक्ष श्री. नरेंद्रभाऊ पाटील, उपस्थित  होते,

   सदर संघटनात्मक बैठकीसाठी  जिल्हा, तालुका, शहर लोकप्रतिनिधी, शक्तीकेंद्र प्रमुख, प्रभागप्रमुख, बुथ प्रमुख पदाधिकारी, यांना चोपडा विधानसभा क्षेत्रात भाजपा -शिवसेना राष्ट्रवादी काॅग्रेस, रि.पार्टी (आठवले) महायुतीचे अधिकृत उमेदवार आण्णासो चंद्रकांतजी सोनवणे यांच्या विजयासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले..  वरील मान्यरांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्यात.

        यावेळी चोपडा शहर अहिर शिंपी समाजाच्या वतीने महायुतीचे उमेदवार श्री. चंद्रकांतजी सोनवणे यांना निवडणूकीत सामाजाचा पाठिंबा असलेले पत्र दिले,

 तसेच  वर्डी येथील व डाॅ. चंद्रकांत बारेला यांचे विश्वासू तसेच राट्रवादी काॅग्रेस शरद पवार पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते श्री. सचिन डाभे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यांना ना.श्री. गिरीशजी महाजन व ना.श्रीमती रक्षाताई खडसे व उपस्थित मान्यवरांनी भाजपाचा गमछा देवून प्रवेश दिला,

    या संघटन बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस श्री. राकेश पाटील यांनी तर आभार शहराध्यक्ष श्री. नरेंद्र पाटील यांनी मानलेत,    यावेळी भाजपा ग्रामीण मंडळ, शहर, युवा मोर्चा, किसान मोर्चा, महिला मोर्चा, कायदा सेल, तीर्थक्षेत्र विकास, एन.टी. सेल, ओबीसी सेलचे विविध पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने