विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी..धुळे जिल्ह्यात अंदाजे 65.24 टक्के मतदान
धुळे, दि.20 (प्रतिनिधी) : धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा, शिरपूर या पाचही विधानसभा मतदारसंघात आज सकाळी 7.00 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सांयकाळी 5.00 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 59.75 टक्के मतदान झाले आहे. तर रात्री उशिरापर्यंत 65.24%मतदान झाल्याचा अंदाज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे.
विधानसभा मतदार संघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात सकाळी 7.00 ते सांयकाळी 5.00 वाजेपर्यंत झालेले मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे :
साक्री-61.61 टक्के, धुळे ग्रामीण-63.01 टक्के, धुळे शहर-51.64 टक्के, शिंदखेडा-60.45 टक्के, शिरपूर 61.74 टक्के याप्रमाणे जिल्ह्यात सरासरी 59.75 टक्के मतदान झाले आहे. ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.
0