महायुतीचे उमेदवार अण्णासाहेब प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या प्रचंड संख्येने उपस्थित राहा .. भाजपा पदाधिकारींचे आवाहन

 महायुतीचे उमेदवार अण्णासाहेब प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या प्रचंड संख्येने उपस्थित राहा .. भाजपा पदाधिकारींचे आवाहन .. 

चोपडा दि.२८(प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टी चोपडा विधानसभा क्षेत्रातील चोपडा शहर, ग्रामिण व यावल ग्रामीण मंडल मधील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा पदाधिकारी, मंडल पदाधिकारी, आघाड्या, मोर्चा, प्रकोष्ठ, सेल चे पदाधिकारी, जि.प. गट, पं.स. गण प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख, सहकार क्षेत्रातील संचालक, सरपंच, सदस्य आदी सर्व भाजपा कार्यकर्ता यांनी स्थानिक पातळीवरही युती धर्म पाळून  महायुतीचे धनुष्य बाण चिन्हावर निवडणूक लढविणारे अधिकृत उमेदवार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन चोपडा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारींनी केले आहे.

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, माजी उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, ना. मंत्री श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या आदेशान्वये तसेच  ना. श्रीमती रक्षाताई खडसे,प्रदेश सरचिटणीस  विजयभाऊ चौधरी,विभाग संघटनमंत्री रविजी अनासपूरे,जिल्हाध्यक्ष अमोलदादा जावळे यांच्या सुचनेनुसार चोपडा विधानसभा  क्षेत्र निवडणूक २०२४ करीता भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काॅग्रेस अजित पवार गट, रिपाई (आठवले गट),  महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रा. श्री. आण्णासो चंद्रकांत बळीराम सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिनांक - २९  आँक्टोंबर २०२४रोजी वेळ - १०.३०  वाजता आनंदी भवानी माता मंदीर, मल्हारपूरा  चोपडा येथे जमावयाचे आहे आणि तहसील कार्यालयात जाऊन नामांकन दाखल करावयाचे आहे तरी भारतीय जनता पक्षाचे सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री.गोविंदजी सैंदाणे(भाजपा चोपडा वि.स. निवडणूक प्रमुख ),श्री. राकेश पाटील(महायुती समन्वयक ),श्री.चंद्रशेखर पाटील,(भाजपा अध्यक्ष चोपडा ग्रामीण ),श्री. उमेशदादा फेगडे, (भाजपा अध्यक्ष यावल ग्रामीण ), श्री. नरेंद्रभाऊ पाटील(भाजपा अध्यक्ष चोपडा शहर ) यांनी केले आहे.

  गाड्यांच्या पार्किंग येथे राहणार 

मा. आ. प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांचा फॉर्म भरण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांकरिता गोरगावले फाट्या शेजारी एस. के. नगर येथील खुल्या जागेवर पाकिऀंगची व्यवस्था करण्यात आली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी  असेही नियोजन कर्त्यांकडून कळविण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने