ठाकरे शिवसेना व मविआचे अधिकृत उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांची एन्जीओप्लास्टी.. तब्येत बघण्यासाठी नेते कार्यकर्त्यांची गर्दी..
चोपडा (प्रतिनिधी) चोपडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार प्रभाकरआप्पा सोनवणे यांना आज सकाळी ह्दय विकाराचा त्रास जाणवल्याने जळगाव येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले असता एक ब्लॉकेज असल्याचे लक्षात आल्यानंतर एन्जीओप्लास्टी करण्यात आली असून तब्येत ठीक असल्याची माहिती आप्पांचे चिरंजीव दिनेश सोनवणे यांनी दिली आहे.
जळगावहून चोपडा येथे प्रचाराला जात असताना कारमध्येच अचानक छाती दुखू लागल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने जळगाव शहरातील रिदम् हॉस्पिटलमध्ये पचारार्थ दाखल करण्यात आले.त्यानंतर डॉ.अमोल पाटील यांनी प्रभाकर सोनवणे यांची एन्जिओग्राफी केली असता त्यांच्या हृदयात एक ब्लॉक असल्याचे समजले. त्यानंतर तातडीने त्यांच्यावर एन्जोप्लास्टी करण्यात आली आहे. दरम्यान,आप्पांची प्रकृती ठणठणीत आहे आणि लवकरच ते प्रचारात सहभागी होतील अशी माहिती त्यांचे मोठे चिरंजीव दिनेश सोनवणे यांनी दिली आहे, प्रभाकर आप्पा सोनवणे यांची प्रकृती पाहण्यासाठी रुग्णालयात कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मोठी गर्दी केली होती.