चोपड्यात पहिल्याच दिवशी 28 नामनिर्देशनपत्रांचे वितरण
चोपडा,दि. २२(प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी चोपडा विधानसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी 28 नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आली आहे. तेरा उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींनी हे 28 अर्ज वितरीत करण्यात आले आहेत .
प्रशासनाच्या वतीने नामनिर्देशन पत्रांच्या विक्रीसाठी आणि स्वीकृतीसाठी तयारी पूर्ण केली असून उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना कमीत कमी वेळात नामनिर्देशन पत्र दाखल करता यावे अशी यंत्रणा राबविण्यात आली आहे.