भारतीय संस्कृतीचा परिचय भारतीय ज्ञान प्रणालीच्या माध्यमातून होतो : ॲड. संदीप सुरेश पाटील

 भारतीय संस्कृतीचा परिचय भारतीय ज्ञान प्रणालीच्या माध्यमातून होतो : ॲड. संदीप सुरेश पाटील

चोपडा,दि.९(प्रतिनिधी) : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाच्या भूगोल विभागातील प्रा. डॉ. शैलेशकुमार वाघ, प्रा. डॉ. मुकेश पाटील, प्रा. सुभाष खैरनार व कुसुंबा महाविद्यालयातील प्रा. डॉ. सिद्धार्थ सोनवणे लिखित भारतीय ज्ञान प्रणाली (इंडियन नॉलेज सिस्टीम) या विषयावरील पुस्तक प्रकाशन समारंभ प्रसंगी समारंभाचे अध्यक्ष व महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील यांनी प्रतिपादन केले. भारतीय संस्कृती जगातील प्राचीन व महान संस्कृती असून तिचा परिचय या पुस्तकाच्या माध्यमातून पुढील पिढीला ज्ञात होणार आहे. ॲड. संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील यांचे शुभहस्ते भारतीय ज्ञान प्रणाली या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 अंतर्गत भारतीय ज्ञान प्रणाली हा विषय कला, विज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन या शाखांना लागू करण्यात आला आहे. मराठी भाषेतील अल्प प्रमाणात संदर्भ उपलब्ध असल्याने डॉ. शैलेश वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी या विषयावरील पुस्तकाचे लेखन केलेले आहे. त्यांच्या या लेखन कार्याचे कौतुक याप्रसंगी ॲड.  संदीप पाटील यांनी केले. प्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतीय वेद-पुराणे, भाषा, शिक्षण, विद्यापीठे, कला, संस्कृती, कृषी व व्यापार या घटकांचा समावेश आहे. 

पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, डॉ. ए. बी. सूर्यवंशी, रजिस्ट्रार डी. एम. पाटील, मोतीराम पावरा, विश्वनाथ पाटील, दिपक चौधरी उपस्थित होते. महाविद्यालयातील सर्व अध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉ. वाघ, डॉ. पाटील यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने