विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये प्रताप विद्या मंदिराची यशोपताका

 विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये प्रताप विद्या मंदिराची यशोपताका

चोपडा दि.२५(प्रतिनिधी )स्व. बाबासाहेब के नारखेडे यांच्या 44 व्या स्मृतीदिनानिमित्त राज्यस्तरीय  वकृत्त्व, गीत गायन, व निबंध स्पर्धा भुसावळ  येथील के नारखेडे विद्यालयात संपन्न झाल्यात.त्यात चोपडा येथील प्रताप विद्या मंदिराची विजयी पताका सदैव फडकवित विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत विद्यालयाचे उपशिक्षक पंकज शिंदे यांनी राज्यस्तरावर दुसरा क्रमांक प्राप्त केला.

  यशस्वी विद्यार्थ्यांना कु. पी.एस. ठाकरे, एम.एफ. माळी, पी बी कोळी या मार्गदर्शक शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांचे डॉ.दिलीप देशमुख (विज्ञान  विभाग प्रमुख) टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्यासह अन्य  मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व वाचनीय पुस्तके  देऊन सन्मानित करण्यात आले.

             संस्थेचे अध्यक्ष शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, चेअरमन राजाभाई मयूर, सचिव माधुरीताई मयूर, कार्यकारणी सदस्य चंद्रहासभाई गुजराथी ,भूपेंद्रभाई गुजराथी तसेच शाळेचे मुख्याध्यापक पी एस गुजराथी ,उपमुख्याध्यापक पी डी पाटील, पर्यवेक्षक एस एस पाटील, एम डब्ल्यू पाटील, ए एन भट, उपप्राचार्य जे एस शेलार, समन्वयक गोविंदभाई गुजराथी ,उल्हासभाई गुजराथी ,डी टी महाजन तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी त्यांचे अभिनंदन केले.

विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे :

       ▫️गट क्रमांक 1 वकृत्त्व स्पर्धा 

 *अविका कमलेश गायकवाड* *राज्यस्तरीय प्रथम क्रमांक*  *स्वरा महेंद्र पाटील  राज्यस्तरीय तृतीय क्रमांक* 

▫️गट क्रं 2 वकृत्त्व स्पर्धा 

 *कैस खान रजा खान राज्यस्तरीय तृतीय क्रमांक*

 ▫️गट क्रमांक 3 वकृत्त्व स्पर्धा 

 *मुग्धा विजय याज्ञिक*  *राज्यस्तरीय प्रथम क्रमांक* 

▫️गट क्रमांक 4 वकृत्त्व स्पर्धा

  *रोशनी देविदास पाटील*  *राज्यस्तरीय प्रथम क्रमांक*  

 ▫️उत्स्फूर्त वकृत्त्व स्पर्धेत

 *वेदिका सुनिल साळुंखे*  *राज्यस्तरीय प्रथम*

▫️ सुगम संगीत गायन 

 *घनश्याम रवींद्र कोळी*

 *राज्यस्तर तृतीय*

▫️  राज्यस्तर निबंध स्पर्धा

 *स्पर्श डिगबंर  पाटील* 

 *राज्यस्तरीय प्रथम क्रमांक*...

गट क्रमांक 4

 *भूमिका नंदलाल तांबट  राज्यस्तर तृतीय क्रमांक* 


 *▫️शिक्षकांसाठी आयोजित राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धा गट* 

  *पंकज प्रतापराव शिंदे सर*  *राज्यस्तरीय  द्वितीय क्रमांक* 


वकृत्व स्पर्धेत सृष्टी नरेंद्र महाजन व गीत गायन स्पर्धेत गायत्री रवींद्र कोळी यांनी देखील यशस्वी सहभाग नोंदवला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने