शिवसेना (शिंदे गट)विमुक्त जाती जमाती शिंदखेडा तालुका अध्यक्ष पदी कृष्णा शिंदे

 शिवसेना (शिंदे गट)विमुक्त जाती जमाती शिंदखेडा तालुका अध्यक्ष पदी कृष्णा शिंदे 

शिंदखेडादि.२६(प्रतिनिधी):- तालुक्यातील वसमाने तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील कृष्णा शिंदे यांची  शिंदखेडा तालुका विमुक्त जाती जमाती अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे 

बंडखोरी मुळे राज्यात शिवसेना पक्ष ठाकरे आणि शिंदे आशा दोन गटात विभागला गेला आहे तसेच शिवसेना च्या या फुटीचे परीणाम जिल्ह्यासह तालुका पातळीवर देखील बघायला मिळत आहे शिवसेना चे फुटीचे परीणाम धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात सुद्धा पाहायला मिळाले होते 

त्या नंतर आता शिवसेनेचे  (शिंदे गट) विमुक्त जाती जमाती शिंदखेडा तालुका अध्यक्ष पदी कृष्णा शिंदे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार एकमताने निवड करण्यात आली आहे त्यांना निवडीचे पत्र शिवसेना चे धुळे जिल्हा अध्यक्ष मनोज मोरे (शिंदे गट) यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले 

कृष्णा शिंदे यांनी शिंदखेडा तालुक्यात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहुन सर्व सामान्यांच्या अडचणींना प्रशासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे या कामाची दखल घेऊन शिवसेना धुळे जिल्हा अध्यक्ष मनोज मोरे यांनी कृष्णा शिंदे यांच्या कडे तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे 

दरम्यान या वेळी धुळे जिल्हा अध्यक्ष श्री मनोज मोरे, भटक्या आघाडी जिल्हाध्यक्ष श्री संजय कुसळकर माजी नगरसेवक संजय वाल्हे यांच्या सह शिवसैनिक व वडार समाजातील बांधव उपस्थित होते तसेच  राज्याचे भटक्या आघाडी चे युवा नेते श्री राजु सुर्यवंशी यांनी दुरध्वनी वरुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने