नामांकित महाविद्यालयांमध्ये"आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना"..

नामांकित  महाविद्यालयांमध्ये"आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना".. 

♦️  युवक युवतींना होणार  मोठ्ठा लाभ.. ३२ कॉलेजचा समावेश ..नाव वाचा सविस्तर 


 जळगाव दि. 16 ( प्रतिनिधी ) - कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातून राज्यामधील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करुन महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र ची स्थापना करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ३२ महाविद्यालयांमध्ये सुरु करण्यात येणाऱ्या या केंद्रांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक २० सप्टेंबर, २०२४ रोजी ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. या केंद्रामधून मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

            जळगाव जिल्हयातील लोकसेवक मधुकरराव चौधरी सामाजिक कार्य महाविद्यालय जळगाव, TES चे भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ, खान्देश कॉलेज एज्युकेटॉन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅड मॅनेजमेंट, जळगाव, नवलभाऊ प्रतिष्ठान ITI, अमळनेर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, कॅम्पसमधील जळगाव, नवलभाऊ कृषी महाविद्यालय, अमळनेर, पी.आर हायस्कूल सोसायटीचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, धरणगाव, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुर्हा काकोडा, मुक्ताईनगर, तापी व्हॅली एज्युकेशन सोसायटी, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर, शासकीय पॉलिटेक्निक, जळगाव, पीडीयूएसपीएम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅड रिसर्च, जामनेर, शासकीय आयटीआय, भुसावळ, एडीपीएम महिला महाविद्यालय, जळगाव, टेक्निकल अँड मेडिकल एज्युकेशन सोसायटीचे जे.टी महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय, फैजपूर जि. जळगाव, MGSM चे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कॉलेज, चोपडा, जुलालसिंग मंगटू अभियांत्रिकी महाविद्यालय, डिप्लोमा, चाळीसगाव जि. जळगाव, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव जि. जळगाव, संत मुक्ताईबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मुक्ताईनगर जि. जळगाव, अॅड. सीताराम (बबनभाऊ) आनंदरामजी बाहेती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जळगाव, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल ता. यावल जि. जळगाव, शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय, जळगाव, CE सोसायटीचे B. P. Arts, S. M. A. विज्ञान आणि K. K. C. वाणिज्य महाविद्यालय, चाळीसगाव जि. जळगाव, सर्वोदय शिक्षण प्रसारक सहकारी समाज उंबरखेडची औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उबरखेड ता. चाळीसगाव जि. जळगाव, दादासाहेब सुकदेव सोमा भोई ITI, पारोळा ता पारोळा जि. जळगाव, भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालय, पालधी ता. धरणगाव जि. जळगाव, डॉ. अण्णासाहेब जी. डी बेडाळे महिला महाविद्यालय, जळगाव, माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय खेडी बी. के. ता. जळगाव जि.जळगाव, KCE चे व्यवस्थापन आणि संशोधन संस्था, जळगाव, छत्रपती शिवाजी महाराज ITI, पारोळा, श्री व्ही. एस. नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रावेर, मुळाजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव, आणि गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव, अशा ३२ महाविद्यालयांची निवड करण्यात आलेली आहे.

            महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास प्रशिक्षण मोफत देण्यात येणार असून, त्यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा तसेच, २० सप्टेंबर २०२४ रोजी मा प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमास त्या महाविद्यालयांच्या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवारांनी उपस्थित राहून उद्घाटन सोहळा पार पाडावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने