चोपड्यात भगवान बलराम जयंती साजरी

 चोपड्यात भगवान बलराम जयंती साजरी



चोपडा,दि.११(प्रतिनिधी) - येथील भारतीय किसान संघाच्या शाखेतर्फे शेतक-यांची देवता भगवान बलराम जयंती निमित्ताने प्रतिमा पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली.यावेळी किसान संघाच्या कार्याचा परिचय व भगवान बलराम या आद्य कृषक देवतेला का पुजावे याबाबत जिल्हा महिला आघाडी प्रमुख कविता वाणी यांनी मनोगत व्यक्त केले.तर प्रतिमा पूजन तालुकाध्यक्ष अनिल भिकाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राजेंद्र बाबुराव महाजन, भारत मणीलाल पाटील, काशिनाथ शिवराम पाटील, अनिल बारेला, जगदीश धनगर, गोपाल महाजन, हेमंत वाणी
या कार्यकर्त्यांसह शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने