जि.प.मराठी शाळा चौगाव येथे शिक्षक दिवस साजरा

 जि.प.मराठी शाळा चौगाव येथे शिक्षक दिवस  साजरा

चोपडा दि.५(प्रतिनिधी)-    5 सप्टेंबर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस... याच दिवशी शिक्षक दिवस शिक्षकांचा सन्मानासाठी साजरा केला जातो. जि.प.मराठी शाळा चौगाव येथील शिक्षक व शिक्षीका यांचा शाल,गुलाब पुष्प व शिक्षकांना टोपी घालून सन्मान देऊन डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिक्षक दिवस साजरा करण्यात आला.  

   प्रसंगी यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.कैलास बाविस्कर माजी उप सरपंच लासूर व श्री.संदीप कोळी यांनी शिक्षकांविषयी विध्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा प्रसंगी श्री.कैलास बाविस्कर माजी उपसरपंच लासूर,पो.पा.श्री.गोरख पाटील,श्री. संदीप कोळी, तसेच गावातील श्री. युवक संदीप सूर्यभान कोळी व शाळेतील मुख्याध्यापक श्री. संतोष सोनवणे, शिक्षक श्री.विद्यानंद साठे,शिक्षक श्री.श्री.अनिकेत पाटील,शिक्षीका सौ.राजश्री बाविस्कर,सौ.प्रिती भावसार,सौ. प्रितम सोनवणे,सौ. कविता गावित,सोबत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने