आमदार सौ.लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने बुधगावसाठी ५० लाख तर विरवाडा -विष्णापुर रस्त्यासाठी दीड कोटींचा निधी मंजूर

 आमदार सौ.लताताई सोनवणे व  माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे  यांच्या प्रयत्नाने बुधगावसाठी ५० लाख तर विरवाडा -विष्णापुर रस्ता व पुलासाठी दीड कोटींचा निधी मंजूर 

चोपडा दि.५(प्रतिनिधी) :आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व कार्यसम्राट माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या  सहकार्याने  चोपडा विधानसभा मतदारसंघात रस्ते व पुल  दुरुस्ती परिक्षण कार्यक्रम (३०५४-२४१९) अंतर्गत गट 'क' व 'ब 'संवर्गातील 2 कोटींचे  कामे  नुकतीच मंजूर झाली असून महाराष्ट्र शासन कार्यासन अधिकारी निलेश ठाकुर यांनी शिक्कामोर्तब केला आहे.

 ना. गिरीशभाऊ महाजन यांचेकडे पत्रान्वये चोपडा विधानसभा मतदारसंघातील  आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी बुधगाव आणि विरवाडे-विष्णापूर रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरणाची निकड असल्याचे स्पष्ट करून मागणी केली होती.त्या कामाचा निपटारा करण्यासाठी कार्यसम्राट माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे सदोदित पाठपुरावा केल्याने  काम मंजूर झाले आहे.त्यात बुधगाव  ते प्राथमिक शाळा इजीमा ७ ला मिळणारा २ किमी रस्ता  मजबूतीकरण व डांबरीकरण करणेसाठी ५० लाख (पन्नास लाख )रुपये तर  विरवाडे ते विष्णापुर रस्त्यावर मोठ्या पुलांसह  १ किमी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १ कोटी ५० लाख (दिड कोटी) रुपये एवढा निधी मंजुर झाला आहे. ना.गिरीषभाऊ महाजन यांनी उपरोक्त कामांची दखल घेऊन मार्गी लावल्याबद्दल आमदारद्वयींनी  आभार व्यक्त केले आहेत. या कामांची लवकरच निविदा निघून लगेचच सुरुवात करण्यात येणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने