कमळगाव अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयात वह्या वाटप

 कमळगाव अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयात वह्या वाटप 

कमळगाव,ता.चोपडा दि.15(प्रतिनिधी) ग्राम विकास मंत्री ना.श्री.गिरीशभाऊ महाजन व केंद्रीय क्रीडा,युवक कल्याण मंत्री ना.श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा तर्फे अनुसूचित जमाती विभाग जिल्हाध्यक्ष मगन बाविस्कर (सर) यांच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय कमळगाव शाळेत गरीब गरजवंत विद्यार्थिनींना वह्या वाटप करून मोलाचा हात दिला आहे.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आल्या. 

याप्रसंगी पि के नायदे सर , पाचपोळ सर, जाधव सर आर एम पाटील सर, नितिन पाटील सर, अर्जुन कोळी सर, विशाल धनगर सर ,पि.पि बाविस्कर सर,दोडे सर ,सावळे सर, कचरे भाऊसाहेब, दिनकर न्हायदे, सुनिल धनगर, अभिषेक सुर्यवंशी समस्त गावकरी बंधू भाजप कार्यकर्ते,हे उपस्थित होते.यांच्या हस्ते 150 वह्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या.यावेळी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वह्या भेटल्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद ओसांडून वाहत होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने