राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विज्ञान अभ्यासक्रमाची पुस्तकांचे प्रकाशन

 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विज्ञान अभ्यासक्रमाची पुस्तकांचे प्रकाशन

दोंडाईचा दि.३०(प्रतिनिधी) येथील प्रा.डॉ प्रकाश लोहार, प्राचार्य एस एस व्ही पी एस संस्थेचे पा.बा. बागल महाविद्यालय दोंडाईचा. प्रा डॉ अनिल पाटील, प्र. प्राचार्य व्ही एस नाईक महाविद्यालय रावेर, प्रा डॉ सागर धनगर, धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर व प्रा डॉ एम व्ही अमृतसागर, एस एस व्ही पी एस महाविद्यालय,  धुळे. यांच्या द्वारा लिखित प्रथम वर्ष प्राणीशास्त्र विषयाचे फंडामेंटल ऑफ मिडीकल लॅब टेक्नीक्स व प्रात्यक्षिकांवर आधारित अशा   वृंदा प्रकाशनद्वारा निर्मित दोन क्रमिक पुस्तकांचे विमोचन श्रीमती पा.बा. बागल महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष, तथा माजी नगराध्यक्ष बापूसाहेब डॉ. रवींद्र देशमुख , एस एस व्ही पी एस संस्थेचे कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य बापूसाहेब प्रा. डॉ. मनोहर पाटील, बामखेडा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ. एच. एम. पाटील सर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ माजी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. शशिकांत बोरसे सर तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री .सुरेश महाजन यांच्या हस्ते महाविद्यालयात आयोजित विद्यापीठस्तरीय एकदिवसीय विद्यार्थी संवेदीकरण कार्यशाळेत करण्यात आले.*

 *विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे प्राचार्य डॉ. पी.एस. लोहार सर यांचे हे संदर्भ ग्रंथांसहीत २५  आणि २६ क्रमांकाचे पुस्तक आहे. त्यांचे अनेक पुस्तके भारतातील विविध ६५ विद्यापीठांमध्ये संदर्भसूचित समाविष्ट आहेत.यासंदर्भात कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ रवींद्र देशमुख यांनी प्राचार्य डॉ लोहार यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल गौरवोद्गार काढून त्यांचे अभिनंदन केले*.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने