विद्यार्थीनींनी झाडांना राख्या बांधून दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश'..भगिनी मंडळ - कला व वाणिज्य महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

 'विद्यार्थीनींनी झाडांना राख्या बांधून दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश'..भगिनी मंडळ - कला व वाणिज्य महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

चोपडा (प्रतिनीधी) - भगिनी मंडळ संचलित, कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी रक्षाबंधन हा सण झाडे लावा, निसर्ग वाचवा हा संदेश देत झाडांना राख्या बांधून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्विकारून आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा केला.

मानवी जीवनात झाडांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, ते आपल्याला अमूल्य असा प्राणवायू विनामूल्य देतात, या बदल्यात आपण देखील त्यांच्या प्रति कृतज्ञतेच्या भावनेतून काहीतरी केले पाहीजे या हेतूने प्रेरित होवून हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे विभागप्रमुख डाॅ.संजय चौधरी, अनिल बाविस्कर, सेजल शाह, तुषार बाविस्कर, अरमान पठाण, एकता अग्रवाल, राधा गुजराथी, भाग्यश्री महाजन, प्रमोद वाघ, परेश चित्ते आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.हा उपक्रम कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या परीसरात संपन्न झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने