बीआरएसचे समाधान बाविस्करांनी वाढदिवसानिमित्ताने शाळेला वृक्ष लागवडीसाठी दिली देणगी

 बीआरएसचे समाधान बाविस्करांनी वाढदिवसानिमित्ताने  शाळेला वृक्ष लागवडीसाठी दिली देणगी 

चोपडा दि.२४( प्रतिनिधी)विद्यार्थ्यांचं पहिलं विद्यापीठ म्हणजे आई आणि जिथून आपल्या जीवनाची सुरुवात होते ती म्हणजे आपली मराठी शाळा. इथूनच आपला पाया पक्का होतो म्हणून आपल्या पाठशाळेला कधी विसरू नये असे मत चोपडा बीआरएस तालुका समन्वयक समाधान युवराज बाविस्कर यांनी व्यक्त केले.त्यांनी  वाढदिवसानिमित्ताने आपल्या सनपूले गावातील मराठी शाळेला झाडे जगविण्यासाठी पंधराशे रुपये रोख स्वरूपात देणगी दिले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी रतिलाल  बाविस्कर, नाना न्हावी ,मुख्याध्यापक, शिक्षक वृंदावन यांनी त्यांचे आभार मानले.या अगोदर बाविस्कर यांनी तालुक्यात दिव्यांगांना अन्नदान, महिलांना मोफत शिलाई मशीन, 15 ऑगस्टला आदिवासी मुलींना जेवण ,वस्तीगृह ला दहा खुर्च्या मोफत दिल्या आहेत. त्यांच्या या कार्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने