लोकसंख्यावाढीच्या समस्यांबाबत जागृती.. चोपडा रोटरी क्लबचा उपक्रम

 लोकसंख्यावाढीच्या समस्यांबाबत जागृती.. चोपडा रोटरी क्लबचा उपक्रम

चोपडा दि.12(प्रतिनिधी)- तालुक्यातील वडती येथील अमर संस्था संचलित साने गुरुजी माध्यमिक हायस्कूलमध्ये जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून 'लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या' या विषयावर चोपडा येथील समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. राहुल निकम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे आयोजित या जनजागृतीपर कार्यक्रमात लोकसंख्या वाढीमुळे  होणारे दुष्परिणाम याबाबत इ. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सखोल माहिती देण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्यात भेडसावणाऱ्या समस्या व त्यावरील उपाययोजना यांची माहिती करून देणे तसेच ग्रामीण भागात रोटरीचे कार्य पोहचविणे हा उपक्रमाचा हेतू होता. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे प्रा. निकम यांनी शंका समाधान केले.

        यावेळी प्रकल्प प्रमुख रोटे. व्ही. एस. पाटील, क्लब अध्यक्ष डॉ. ईश्वर सौंदाणकर, सचिव बी. एस. पवार, कोषाध्यक्ष प्रदीप पाटील व रोटरी सदस्य उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजय जोशी, अतुल चव्हाण, चेतन पाटील, राजेश चौधरी, प्रशांत गुरव, रवींद्र पाटील, जगदीश पाठक, विजय पालीवाल, विनोद धनगर व अतुल धनगर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल धनगर यांनी केले व आभार प्रदर्शन अतुल चव्हाण यांनी केले.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने