बी.आर.एस.च्या कोमल ताई पाटील यांच्या प्रयत्नाने १२ महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप

 

बी.आर.एस.च्या कोमल ताई पाटील यांच्या प्रयत्नाने १२ महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप


चोपडा दि.१(प्रतिनिधी)भारत राष्ट्र समिती पक्षाचे चोपडा विधान  सभा प्रमुख व तसेच जळगाव जिल्हा महीला आघाडीचे सौ. कोमलताई पाटील व  चोपडा तालुका महीला आघाडीच्या टिना जाधव याच्या प्रयत्नांना यश मिळाले असून आज दिनाक 1 जुन रोजी वढोदा तालुका चोपडा या ठिकाणी 12  गरजु  महिलांना रोजगार मिळावा म्हणून शिलाई मशिन वाटप करण्यात आले.
यावेळीआशाबाई बाबुलाल कुंभार,जयश्री गोपाल पाटील
अक्षया बापू वानखेडे,मयुरी किरण पाटील,आशाबाई ज्ञानेश्वर पाटील,जुन्याबाई निंबा पाटील,पुष्पाबाई भरत पाटील ,हेमांगी शांताराम पाटील,लताबाई शांताराम पाटील,अपेक्षा समाधान बाविस्कर,नेहा बापूराव पाटील, अर्चना अनिल पाटील या महिलांना शिलाई मशिन वाटप करण्यात आले.
याप्रसंगी चोपडा विधान सभा प्रमुख समाधान बाविस्कर , अध्यक्ष कोमलताई पाटील, तालुका महीला प्रमुख टिना जाधव ,तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन कोमल पाटील केसरलाल पाटील, रोहीत पाटील ,धिरज करंदीकर ,मनिषा पाटील, पमाबाई पानपाटील, अर्चना पाटील, प्रियका करनदीकर हे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने