लोणी कुणबी पाटील समाजाची कार्यकारिणी जाहिर

 लोणी कुणबी पाटील समाजाची कार्यकारिणी जाहिर


जळगाव दि.२(प्रतिनिधी): 
लोणी कुणबी पाटील समाज बहुउद्देशीय संस्थेची वाषिर्क बैठक नुकतीच संपन्न झाली. यात पुढील वर्षासाठी नूतन कार्यकारिनीची निवड करण्यात आली. समाजातील अडअडचणी सोडविण्यासाठी ही कार्यकारिणी काम करणार आहे.
नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी धनंजय डिगंबर पाटील, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माणिक पाटील, सचिव अमोल सुभाष करंजे, सहसचिव मिलिंद बाबुराव पाटील, खजिनदार गणेश रामकृष्ण पाटील, सदस्य म्हणून अविनाश राजाराम पाटील, ईश्वर पांडुरंग शिंदे, गजानन तुळशिराम पाटील,  सुनिल दत्तू सोनवणे, शशिकांत नारायण पाटील, लक्ष्मण हिरामण पाटील, तुषार फकिरा पाटील तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून अनिकेत विजय पाटील यांची निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचितांचे समाजबांधवांकडून स्वागत करण्यात आले असून आगामी काळात समाजातील समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. विविध समाजोपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने