महाजन विद्यालयात योगा दिवस साजरा : विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 महाजन विद्यालयात योगा दिवस साजरा : विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 


अडावद ता. चोपडा दि.२२(प्रतिनिधी):येथील संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था अडावद संचालित शामराव येसो महाजन विद्यालय व आदर्श प्राथमिक शाळा येथे योगा दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना पुन्हा योगसाधनेचे धडे मिळाले. यावेळी काही पालकांनीही उपस्थित होते. 

    २१ रोजी सकाळी ७:३० वाजता शाळेच्या प्रांगणात दोन्ही शाळेचे विद्यार्थी शिस्तबद्ध पणे अंतराने उभे राहिले प्रार्थना नंतर पूरक हालचाली झाल्यात ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, वज्रासन, अर्धउष्ट्रासन, उष्ट्रासन, शशांकासन, उत्ताण मंडुकासन, वक्रासन, भुजंगासन, शलभासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासन, शवासन, प्राणायाम इत्यादी आसने करून ध्यान, संकल्प आणि शांतीपाठाने शेवट करण्यात आला. सर्व आसने विद्यार्थ्यांकडून करून घेण्यासाठी 

 शा.ये.महाजन विद्यालयाचे   मुख्याध्यापक आर. के. पिंपरे, एन. ए. महाजन, व्ही. एम. महाजन, एस. जी. महाजन, एम.एन. माळी, पि. आर. माळी, एस. बी. चव्हाण, एस. के. महाजन, पि.एस. पवार आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी. बी. महाजन, एस. टी. महाजन, आर. जे. महाजन, वाय. एल. साळुंखे, डी. आर. वाघ, कामिनी चौधरी, वर्षा महाजन तर शिक्षकेतर कर्मचारी लिपिक सी.एस.महाजन, शिपाई ईश्वर मिस्तरी, रविंद्र महाजन, कैलास महाजन, अशोक महाजन आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने