जळगांव जिल्ह्याच्या भविष्याकरिता सातपुडा वन संवर्धन करणे काळाची गरज! - शुभम सोनवणे

 जळगांव जिल्ह्याच्या भविष्याकरिता सातपुडा वन संवर्धन करणे काळाची गरज! - शुभम सोनवणे

चोपडा,दि.26(प्रतिनिधी )- सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या समृद्ध जळगांव जिल्ह्यात आज उकाड्याची तीव्रता पाहता आपण मनुष्यांनी निसर्गाची किती हानी केली आहे. हे लक्षात येते. या वाढत्या तापमानामुळे रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत उष्ण लहरी वातावरणात वाहत आहेत. आपण केलेल्या वृक्ष तोडीची सजा आपल्या येणाऱ्या पिढयांना मात्र मोठ्या प्रमाणात भोगावी लागणार आहे याची वेळेतच काळजी घेऊन तसेच भविष्याची चाहूल लक्षात घेऊन आपण याच वर्षी प्रत्येकाने पाच वृक्ष लावण्याचा व त्यांना जगविण्याची जबाबदारी घेतली तरच आपण आपल्या सह पुढच्या पिढीला उत्तम आयुष्य जगायला देऊ शकतो. अन्यथा, वर्तमान परिस्थिती पाहता कुठलेही पाऊल उचलले गेले नाही तर या उकाड्याच्या उन्हात सजीव सृष्टीला जगणे कठीण होईल असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहरअध्यक्ष शुभम  सोनवणे यांनी म्हटले आहे 

             याच काळात काही महिन्यापासून शेतात काम करणारे शेतकरी, तसेच उन्हात काम करणारा मजूरवर्ग हा उष्माघातला बळी पडत आहे. ही एक गंभीर धोक्याची सूचना आहे. म्हणून, निसर्ग संवर्धन लक्षात घेता प्रत्येकाने आपण राहतो त्या परिसरात किमान पाच वृक्ष लावण्याची व जगविण्याची जबाबदारी घेतली तरी येणारा धोका काही प्रमाणात नक्कीच कमी होईल. त्याच प्रमाणे, या गंभीर धोक्याकडे सर्वच स्तरावरील लोकप्रतिनिधीनी व सुजाण नागरिकांनी वन विभागाच्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन सातपुडा पर्वतावर होणारी वृक्ष तोड तसेच अवैध रित्या काही नागरिकांना शेतीला वापरायला देणाऱ्या जंगलाच्या जमिनीना आळा घालून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणे आवश्यक असल्याच्या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष दिले पाहिजेअसेही सोनवणे यांनी म्हटले आहे 



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने