दादासाहेब डॉ.सुरेश जी पाटील महाविद्यालयात गुणगौरव सोहळा संपन्न

 दादासाहेब डॉ.सुरेश जी पाटील महाविद्यालयात गुणगौरव सोहळा संपन्न

चोपडा,दि.22(प्रतिनिधी)-येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे,दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयाचा ९८.१७% निकाल लागला असून,कला,वाणिज्य व विज्ञान शाखांचा अनुक्रमे ९५.००%,९९.५२%,९९.९३% असा निकाल लागला आहे.

*कला* शाखेतून *प्रथम*  महाजन करुणा योगराज ८४.६७%,*द्वितीय* चव्हाण प्रगती दिपक ८०.००%, *तृतीय* बागुले प्रियंका विजय ७६.३३% गुणानुक्रम प्राप्त करत उत्तीर्ण झाले आहेत. तर,*वाणिज्य*  शाखेतून *प्रथम*  जैन दिव्या सुनिल ९१.१७%,*द्वितीय*  शहा श्रेया मिलिंद ९०.६७%,*तृतीय*  पाटील कलश राधेश्याम ८८.६७% आणि *विज्ञान*  शाखेतून *प्रथम*  पाटील अस्मिता अनिल ९३.००%,*द्वितीय*  पाटील चैताली दिनेश ९२.००%,*तृतीय*  शुक्ल दुर्गेश विजय ९१.३३% गुणानुक्रमाणे उत्तीर्ण झाले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब अँड.संदीप सुरेश पाटील,सचिव डॉ.स्मिताताई संदीप पाटील,प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांच्या हस्ते आज दि.२२ मे २०२४ रोजी प्रतापगड इमारतीतील स्मार्ट हॉल मध्ये सत्कार करण्यात आला.


तत्पूर्वी प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी प्रस्ताविकातून महाविद्यालयाचा चढता आलेख विशद केला.यावेळी सत्काराला उत्तर म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात दुर्गेश शुक्ल व करूणा महाजन या विद्यार्थ्यांनी मनोगतातून शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.पालक प्रतिनिधी म्हणून अशोक चैत्राम पाटील यांनी संस्था तथा महाविद्यालययात राबवले जाणारे  विविध शैक्षणिक उपक्रमांबाबत मनोगतातून  गौरवोद्गार काढलेत.

अध्यक्षीय भाषणातून भैय्यासाहेब अँड.संदीप सुरेश पाटील यांनी गुणवंत वविद्यार्थी,पालक व शिक्षकांचे अभिनंदन करून,आगामी काळात महाविद्यालयाचा शैक्षणिक आलेख असाच चढता ठेवण्याचे आवाहन उपस्थितांना केले.उपप्राचार्य प्रा.एस.पी.पाटील यांनी आभार मानलेत तर सूत्रसंचालन प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी केले.

कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य प्रा.एन.एस.कोल्हे,उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे,समन्वयक प्रा.डॉ.शैलेश वाघ,रजिस्ट्रार श्री.डी.एम.पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.निलेश सोनवणे,श्री.राकेश काविरे,श्री.धीरज पाटील यांनी परिश्रम घेतलेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने