वर्ल्ड व्हिजन इंडिया तर्फे बिलखेडा जि.प.शाळा विद्यार्थ्यांना आदर्श शौचालय दिले बांधून

 वर्ल्ड व्हिजन इंडिया तर्फे बिलखेडा जि.प.शाळा विद्यार्थ्यांना आदर्श शौचालय दिले बांधून 


धरणगावदि.२१(प्रतिनिधी): तालुक्यातील बिलखेडे जि.प.शाळेत वर्ल्ड व्हिजन इंडिया तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना आदर्श शौचालय चे बाधकाम करून देण्यात आले.हा कार्यक्रम  जि.प शाळा बिलखेड येथे नूकताच पार पडला.या शाळेच्या शौचालयचे उद्धघाटन धरणगाव तालुक्याचे गट विकास अधिकारी सुशांत पाटिल सर व धरणगाव तालुक्याचे गट शिक्षण भावना भोसले मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रस्तावना वर्ल्ड व्हिजन इंडिया चे प्रकल्प अधिकारी जितेन्द्र गोरे यांनी केले.या वेळी व्हिजन इंडिया चे अधिकारीं पौल मोझेस सर व शिल्पा मॅडम  वर्ल्ड व्हिजन इंडिया उपस्थित होतें.

या वेळेस धरणगाव तालुक्याचे शिक्षण अधिकारी भावना भोसले मॅडम यांनी वर्ल्ड व्हिजन इंडिया यांचे आभार वक्त केले व म्हणाले आदर्श शौचालय तालुक्यांत या ठिकाणी पाहायला मिळाले.मुलांना खरी गरज शिक्षण सोबत शौचालयाची खरी गरज आहे.ती वर्ल्ड व्हिजन ने पूर्ण केली.तसेच गट विकास अधिकारी धरणगाव म्हणाले की वर्ल्ड व्हिजन इंडिया चे काम कौुकास्पद  व उत्कृष्ट आहे. मुलांच्या शिक्षणात व गावं विकास सुधारणाया मध्ये मोलाचा वाटा आहे. तसेच वर्ल्ड व्हिजन इंडिया प्रकल्प अधिकारी प्रस्तांवना करीत म्हणाले कि तालुक्याचे मुख्य अधिकारी खूब  चागले मिळाले आहेत व चागले सहकार्य मिळत आहे व अधिक  विकास कामाला गती मिळत आहे प्रकल्प अधिकारी वर्ल्ड व्हिजन म्हणाले तुमच्या सारखे चागले अधिकारी  तालुक्याला मिळाले आहेत.व पुढे बोलतांना म्हणाले की शाळेत अशी सुविधा मिळाली तर मुलांची प्रगती होईल.

वर्ल्ड व्हिजन इंडिया चे पॉल सर म्हणाले अशा कार्यक्रमा मुळे मला माझी शाळा आठवते. मुलांनी शौचालयाचे चांगले उपयोग करावा व शिक्षणात मध्ये पुढे जावे अशी शुभेच्छा वक्त केली . कार्यक्रमाचे सूत्र संचालन वाल्मीक बदाणे सर व रतीलाल वळवी वर्ल्ड व्हिजन तसेच बापु बदाणें यांनी केला.

शाळेची विकास प्रस्तावना शाळेचे मुख्याध्यापक शामकांत पाटील सरांनी केली. तसेच केंद्र प्रमुख माळीसर उपस्थित होते.या वेळेस गावाचे सरपंच, पोलिस पाटील, शिक्षक वर्ग गावातील समस्त गावकरी वर्ल्ड व्हिजन इंडिया चे  कर्मचारी अंकीता मिश्राम, विजेश पवार, निखील कुमार, तसेच स्वयंसेवक आरती पाटील, रचना जाधव उपस्थित होते तसेच विद्यार्थि व पालक उपस्थित होते. व शेवटी वृक्षारोपण   कऱण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने