आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या १०५ कोटींच्या विकास कामांचा..चोपड्यात ४ फेब्रुवारीला मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन व लोकार्पण सोहळा

 

आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या १०५ कोटींच्या विकास कामांचा..चोपड्यात ४ फेब्रुवारीला मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या शुभहस्ते  भूमिपूजन व लोकार्पण सोहळा


चोपडा दि.१(प्रतिनिधी)आ.सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे (आमदार चोपडा विधानसभा)यांचे प्रयत्नातुन मंजुर झालेले १०५ कोटींच्या विकास कामांचा भुमीपुजन व लोकार्पण सोहळा दि.०४ फेब्रुवारी २०२४, रविवार, सकाळी ११ वाजता  खान्देश प्रेस, कोर्टाजवळ, चोपडा जि. जळगांव येथे मुख्यमंत्री ना.श्री. एकनाथजी शिंदे  यांच्या शुभहस्ते होत आहे.
या प्रगती सोहळ्यास प्रमुख अतिथी  म्हणून पालकमंत्री ना. श्री. गुलाबरावजी पाटील (पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री), ना. श्री. गिरीशजी महाजन   (ग्रामविकास मंत्री, पंचायतराज, पर्यटन मंत्री) ना.श्री. अनिल पाटील (मदत पुर्नवसन मंत्री),
आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे (चोपडा विधानसभा), माजी आमदार,प्रा. श्री. चंद्रकांत बळीराम सोनवणे  हे  मान्यवर उपस्थित राहणार आहेत
भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यातील विकास कामे व विकास निधी पुढीलप्रमाणे
♦️१)चोपडा शहरात भूमीगत गटार बांधणे. अंदाजित किंमत : ८५.०० कोटी रु. (पंच्याशी कोटी रु.)
♦️२. चोपडा येथे प्रशासकीय इमारत लोकार्पण करणे.५.०० कोटी रु(पाच कोटी रु.)
♦️३. चोपडा येथे शासकीय गोदाम लोकार्पण करणे.५.०० कोटी रु(पाच कोटी रु.)
♦️४. चोपडा शहरात विविध ठिकाणी सोलर हायमास्ट बसविणे.५.०० कोटी रु(पाच कोटी रु.)
♦️५. चोपडा शहरात महात्मा गांधी उद्यान नुतनीकरणाचे लोकार्पण करणे.४.५० कोटी रु. (चार कोटी पन्नास लाख रु.
तरी कार्यक्रमास शिवसैनिक, पदाधिकारी, नगरसेवक, संरपच , सदस्य व कार्यकर्त्यांसह जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे
.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने