वासुदेव' करतोय घरोघर साहित्य संमेलनाबाबत जनजागृती

 वासुदेव' करतोय घरोघर साहित्य संमेलनाबाबत जनजागृती


साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर [झटपट पोलखोल /प्रतिनिधी]: 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या संमेलनाचा प्रचार आणि प्रसार हा ‌‘वासुदेवा'च्या रुपातून करण्यात येत आहे. साहित्य संमेलनाची माहिती शहरातील घरोघरी जावून जनजागृती करीत आहे.

97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. 2, 3 व 4 फेब्रुवारी 2024 रोजी अमळनेर शहरात होत आहे. त्या अनुषंगाने बुधवारी शहरातील विविध भागात या वासुदेवाने प्रचार केला. तब्बल 72 वर्षांनंतर होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन हा वासुदेव करीत आहे. अलीकडे कालबाह्य होत चाललेला ‌‘वासुदेव' शहरवासीयांना दिसला. 25 जणांची ही टीम होती.

अमळनेर शहरात रेल्वे स्टेशनपासून सुरुवात करून स्वामीनारायण मंदिर, आठवडे बाजार, कोंबडी बाजार, जुने अमळनेर कचेरी रोड मार्गावर दिवसभर या वासुदेवाने प्रचार केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने