माता व बालसंगोपन विषयावर पथनाट्यच्या माध्यमातून आदिवासी पाड्यात जनजागृती

 माता व बालसंगोपन विषयावर पथनाट्यच्या माध्यमातून आदिवासी पाड्यात जनजागृती

चोपडा दि.१३(प्रतिनिधी):आधार बहुद्देशीय संस्था अमळनेर व जपायगो या सामाजिक संस्था मार्फत आदिवासी पाडयामध्ये माता व बाल संगोपन या विषयावर पथनाटच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे.

सदर प्रकल्पा अंतर्गत चोपडा तालुक्यातील वैजापूर व लासुर या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर मातांना शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा व योजना विषयी माहिती व्हावी या उद्देशाने जनजागृती व विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आदिवासीबहुल भागात दवाखान्यात प्रसुती करण्यासाठी महिलांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आधार संस्थे मार्फत गावगावात जाऊन पथनाट्य सादर केले जात आहेत. या पथनाट्याच्या  माध्यमातून गरोदरपणात घ्यायची काळजी, पोषक आहार, लसीकरण, संस्थात्मक प्रसुती, या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे.

या पथनाट्याची थीम बहुचर्चित हिंदी चित्रपट शोले यावर आधारित असून विरू, जय, बसंती, गब्बर यांच्या पात्राच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. सोप्या भाषेत आदिवासी महिलांना व नागरिकांना आरोग्याचे संदेश दिले जात आहे. आता पर्यंत बोराअंजठी, उत्तम नगर व कर्जाने या गावांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सदर पंथनाट्यामध्ये आधार आम्रपाली संस्थेची कर्मचारी.. मुरार, उज्वल भगत, लेनिन महाजन, सागर पावरा, दीपक संदानशिव, गणेश कुंभार, शिवा बारेला, प्रीती बारेला, निशांत कोळी इत्यादी कर्मचऱ्यानी कलाकार म्हणून सहभाग नोंदवला.सदर उपक्रमाचे कौतुक चोपडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने