बेसिक्स ऑफ कन्फेक्षनरी टेक्नॉलॉजी या पुस्तकाच्या लेखिका प्रा. सौ सोनल चौधरी यांचा चोपडा येथे सत्कार

 बेसिक्स ऑफ कन्फेक्षनरी टेक्नॉलॉजी या पुस्तकाच्या लेखिका प्रा. सौ सोनल चौधरी यांचा चोपडा येथे सत्कार 


झटपट पोलखोल/चोपडा प्रतिनिधी.१०फेब्रुवारी :} चोपडा येथील महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान या संस्थेतर्फे प्राध्यापिका सौ सोनल नरेश चौधरी यांचा नुकताच चोपडा येथे सत्कार करण्यात आला. 

महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष  एड. श्री संदीप सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व  तापी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन माजी आमदार श्री कैलास गोरख पाटील, जिल्हा परिषदेत माजी अध्यक्ष श्री गोरख तात्या पाटील, महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव सौ स्मिताताई संदीप पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ भारतीताई बोरसे ,चोपडा सूतगिनीचे  व्हाईस चेअरमन श्री प्रल्हादराव पाटील, ह भ प महंत श्री अशोक दासजी महारात, चोपडा नगर परिषदेचे माजी गटनेते श्री जीवन ओंकार चौधरी, माजी नगरसेविका   सौ राधाताई जयदेव देशमुख, माजी उपनगराध्यक्ष श्री हितेंद्र रमेश देशमुख, चोपडा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री संजीव भाऊ सोनवणे, चोपडा काँग्रेसचे शहर अध्यक्ष बाजार समितीचे संचालक प्रा. नंदकिशोर सांगोरे, ह भ प बापू महाराज लासुरकर, एडवोकेट वसंतराव भोलाणे धरणगाव एन डी महाजन सर, यांचे प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम उपस्थित पाहुण्यांचा सत्कार के डी  चौधरी, टी एम चौधरी, देवकांत के चौधरी, प्रकाश श्रावण चौधरी, सुरेश पितांबर चौधरी, बबनराव चौधरी, सौ धनश्री देवकांत चौधरी, सौ प्रिया सूर्यकांत चौधरी, किरण आनंदा चौधरी ,रवींद्र धुडकू चौधरी, प्रकाश शंकर चौधरी, आदींनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. यावेळी  चोपडा साखर कारखान्याचे संचालक, बाजार समितीचे संचालक, शेतकरी संघाचे संचालक व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्राध्यापिका सोनल चौधरी यांचा सत्कार  करताना विद्या वाचस्पती श्री टी एम चौधरी यांनी प्रा.  सौ सोनल नरेश चौधरी यांचे प्रकाशित पुस्तक बेसिक्स ऑफ कंफेक्शनरी टेक्नॉलॉजी संबंधी माहिती सादर केली. या पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथील न्यू इंडिया पब्लिशिंग एजन्सी या नामांकीत  प्रकाशन संस्थेमार्फत जून 2023 मध्ये करण्यात आले आहे. फूड टेक्नॉलॉजी शिकणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना हे पुस्तक अतिशय उपयुक्त असल्याचे स्पष्ट केले. विशेष करून साखर व  दूध बद्दलची  तंत्रशुद्ध माहिती सोप्या आणि कमी शब्दात शब्दबद्ध केली असल्याचे नमूद केले. संदर्भ ग्रंथ म्हणून या पुस्तकाचा वापर फूड टेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांना उपयुक्त असल्याचे नमूद केले. यावेळी एडवोकेट संदीप सुरेश पाटील, माजी आमदार कैलास गोरख पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख तात्या पाटील यांनी सोनल चौधरी यांच्या कार्याबद्दल कौतुक करून अभिनंदन केले. या तिघांच्या हस्ते सहकारी संस्थांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी सूतगिरणीचे संचालक सर्वश्री चेअरमन कैलास गोरख पाटील, व्हाईस चेअरमन प्रल्हाद रघुनाथ पाटील, संचालक सर्वश्री चंद्रकांत गुलाबराव पाटील ,राजेंद्र भास्करराव पाटील, शशिकांत शांताराम पाटील, साहेबराव शंकर पाटील, संजय उत्तमराव पाटील, रामदास एकनाथ चौधरी, जैन गौरीलाल घेवरचंद, पाटील विनायक संतोष, पाटील श्रावण धनगर, सोनवणे देविदास शंकर, बोरसे भारती महेंद्र, पाटील कमलबाई रमेश, सुनील सिताराम बागुले, रमेश हिम्मतराव सोनवणे, अमृतराव दत्तात्रय वाघ, कैलास ताराचंद बाविस्कर, मार्केट कमिटीचे  माजी उपसभापती नंदकिशोर सांगोरे, संचालक डॉक्टर अनिल पाटील, साखर कारखाना संचालक गोपाळ धनगर, शरद धनगर, श्री शिवाजीराव देसले, चोपडा शेतकी संघाचे संचालक देविदास हरिश्चंद्र धनगर, बाळकृष्ण शंकरराव सोनवणे, या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आदर्श शिक्षक समाज रत्न टी एम चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार श्री रमेश पाटील यांचा त्यांचा सहावा कवितासंग्रह  प्रकाशित झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय श्रीमती पार्वताआई  यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. भव्य दिव्य अशा या कार्यक्रमाला अनेक  मान्यवरांनी उपस्थिती दिली. श्री के डी चौधरी व देवकांत चौधरी यांनी सूतगिरणीच्या निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले मदत केली अशा सर्व नेते व कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले, सौ प्रियाताई सूर्यकांत चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने