चोपडा महाविद्यालयात थॅलेसेमिया चाचणी आणि मधुमेह जागृती" कार्यक्रम संपन्न


चोपडा महाविद्यालयात थॅलेसेमिया चाचणी आणि मधुमेह जागृती" कार्यक्रम  संपन्न



चोपडा दि.२९(प्रतिनिधी)येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित "श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माण शास्त्र  महाविद्यालयात आरोग्य जनजागृती कार्यक्रम: थॅलेसेमिया चाचणी आणि मधुमेह जागृती" कार्यक्रम  संपन्न झाला

27 फेब्रुवारी 2024 रोजी श्रीमती. शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने  आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते  या कार्यक्रमात पुणे येथील मुकुल मोहन फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे , समर्थित आणि फिनोलेक्स पाईप्स जळगाव द्वारे अर्थसहाय्यित थॅलेसेमिया चाचणी आणि मधुमेह जागरूकता सत्रांचा समावेश  होता . कार्यक्रमासाठी त्यांचे प्रतिनिधी श्रीनिवास वराडे  संपूर्ण वेळ उपस्थित होते . लाइफ सेल डायग्नोस्टिक्सचे समन्वयक श्री. प्रफुल्ल चौधरी   त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या रक्त चाचण्या केल्या.  पुणे येथील रुबी हॉल हॉस्पिटलच्या  डॉ. नीता मुन्शी यांचे ऑनलाईन थॅलेसेमियावरील अभ्यासपूर्ण व्याख्यान कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. महाराष्ट्र थॅलेसेमिया मुक्त होण्यासाठी विद्यार्थ्यांना आव्हान करून,  रक्त तपासणी आणि काय काळजी घ्यावी ह्याचे मार्गदर्शन केले, त्यानंतर जळगाव येथील प्रख्यात डॉ. अजिंक्य पाटील यांचे मधुमेह या विषयावर ऑफलाइन व्यापक व्याख्यान झाले.

या सहयोगी प्रयत्नांचा उद्देश या गंभीर आरोग्य समस्यांबद्दल जागरूकता पसरवणे आणि समुदायामध्ये सक्रिय आरोग्य उपायांना प्रोत्साहन देणे आहे. कार्यक्रम चे उद्घाटन महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे  सचिव  ताईसाहेब डॉ. सौ.   स्मिता संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  उद्घाटन व व्याख्याना नंतर सुमारे 500 विद्यार्थी तपासणी साठी सहभागी झाले. त्या साठी आपल्या संस्थेचे डॉ. दादासाहेब सुरेश जी. पाटील नर्सिंग कॉलेज च्या विद्यार्थिनी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नलिनी मोरे यांनी केले. वरील आलेल्या पाहुण्यांचे संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. भैय्यासाहेब श्री. संदीप सुरेश पाटील, सचिव ताईसाहेब डॉ. सौ.  स्मिता संदीप पाटील , प्राचार्य डॉ. जी.पी. वडनेरे, सर्व विभाग प्रमुख  आणि प्रबंधक श्री. प्रफुल्ल मोरे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने