ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सर्विस बुक, प्रॉ .फंड खाते सुरळीत करा अन्यथा आंदोलन : काँ. अमृत महाजन यांचा इशारा

 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सर्विस बुक, प्रॉ .फंड खाते सुरळीत करा अन्यथा आंदोलन : काँ. अमृत महाजन यांचा इशारा 

♦️५फेब्रुवारीला चोपडा पंचायत समितीवर जाण्याचे आवाहन 

चोपडा,दि.१(प्रतिनिधी):ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सर्विस बुक, प्रॉ .फंड खाते सुरळीत करा अन्यथा  जोरदार आंदोलन छेडले जाईल अशा ईशारा देत   येत्या ५ फेब्रुवारी रोजी प्रचंड संख्येने पंचायत समिती चोपडा येथे हजर राहावे असे आवाहन  ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे सचिव काँ. अमृत महाजन यांनी केले आहे.

 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आकृतीबंध अंतर्गत असला तर राज्य शासन वसुली वर आधारित 50 टक्के तर शंभर टक्के  पगार देते पण आकृतीबंध बाहेरच्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायती 35 टक्के अनुदानातून पगार देतात राज्य शासनाचे अनुदान मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना पंचायती देय हिस्सा देत नाहीत. त्यामुळे निम्मा पगारावरच कर्मचाऱ्यांना काम करावे लागते आदिवासी भागात तर वसुली तुन पगार देणे याबाबत अंदा धुंद चालला आहे म्हणून कर्मचाऱ्यांचे सर्विस बुक व प्रा. फंड यातील नोंदणीवरच त्यांचे पुढील भविष्य अवलंबून आहे. म्हणून पंचायतींनी किमान सर्विस बुक व प्रा फंड बंद खातीउघडून ती अद्यावत करणे गरजेचे आहे. यासाठी व इतर मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्न येत्या ५फेब्रुवारी24 रोजी ग्रामपंचायत कर्मचारी पंचायत समितीला नोटीस द्यावी असा निर्णय चोपडा तालुका ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा बैठकीत घेण्यात आला.

 बैठकीचे अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष श्री रमेश पाटील होते ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे सचिव  काँ अमृत महाजन यांनी बैठकीला मार्गदर्शन केले जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गेल्या 16-17 जानेवारी जळगाव येथे ना.गिरीश महाजन यांच्या कार्यालया नजीक जे आंदोलन केले , त्याच्या सर्व रिपोर्ट सादर त्यावेळी कर्मचाऱ्यांनी आकृतीबंध हटवा शंभर टक्के पगाराचं राहणीमान भत्त्याचा अनुदान द्या राहणीमान भत्त्याचा अनुदान द्या किमान वेतनाचा 57 महिन्याचा फरक द्या याबाबतीत ग्रामीण विकास मंत्री यांना निवेदन देऊन युनियनशी चर्चा करावी यावर चर्चा व निर्णय घ्यावा असा प्रस्ताव मांडला आहे सांगून जर तो प्रस्ताव मांडला स्वीकारला नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कर्मचाऱ्यांचा मोर्चा घेण्याचा इशारा देण्यात आला आहे म्हणून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रश्न चोपडा पंचायत समितीला पाच फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता कर्मचाऱ्यांनी वेळेवर हजर राहावे अशी आवाहन  केले आहे 

या बैठकीत तालुक्यातील गलंगी बोर अजंटी भवाळे उमरटी मेलाणे , उमलवाडी नागलवाडी गलवाडे गरताड या गावातील कर्मचारी उपस्थित होते त्यात सर्व श्री कॉम्रेड तालुका उपाध्यक्ष अशोक गायकवाड, सहसचिव राजेंद्र पाटील ,धनराज डावकर, नागेश सोनवणे, सुनील कोळी, मुकेश पावरा ,वासुदेव कोळी, जयेंद्र पाटील, करम सिंग पावरा ,आत्माराम पाटील आदींचा समावेश होता

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने