चित्रसंवाद स्पर्धेतील पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार



चित्रसंवाद स्पर्धेतील पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार 

चोपडा दि.१९(प्रतिनिधी)महिला सक्षमीकरण विषयावर इनर व्हिल क्लब ऑफ चोपडा, व ललित कला केंद्र,चोपडा द्वारा आयोजित *चित्रसंवाद स्पर्धा- २०२४ बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 महिला सक्षमीकरण - महिलांच्या योगदानाद्वारे राष्ट्राला बळकट करणारे *"चित्रसंवाद"* *शिर्षकाखाली* ललित कला केंद्र,चोपडा, महाविद्यालयातील ३०विद्यार्थी कलाकारांनी चित्रनिर्मिती करून सह‌भाग नोंद‌विला.


 "महिला सक्षमीकरणावर -चित्रसंवाद" कलाकृती पारदर्शक व अपारदर्शक जलरंग, पेस्टल ,क्रेऑन पेन्सिल, कलर पेन आणि इंक अश्या विविध माध्यमातून साकारली.

 *प्रथम क्रमांक:* अर्चना वनसिंग वसावे. *द्वितीय क्रमांक:* संचिता संजय बारी . *तृतीय क्रमांक:* सागर राजेंद्र नाथबुवा. आणि

*दोन उत्तेजनार्थ अनुक्रमे:* कुणाल रोहित पाटील, पल्लवी विवेक मराठे यांना *रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.* बक्षिसे पात्र विद्यार्थ्यांनी केलेल्या चित्रसंवाद चित्रा मागची संकल्पना उपस्थितांना समजवून सांगितले. 

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे इनर व्हिल क्लबच्या *सेक्रेटरी, सौ. नितू अग्रवाल,* अध्यक्षस्थानी,भगिनी मंडळ शैक्षणिक संस्थेच्या *अध्यक्षा, सौ. पूनमबेन आशिषलाल गुजराथी,* यांनी इनर व्हिल क्लबचे ध्येय,विविध कार्यपद्धती समजवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.या प्रसंगी ललित कला केंद्रचे प्राचार्य,प्रा.सुनिल बारी,सन्मा.इनर व्हिल कल्बचे पदाधिकारी भगिनी सदस्य,सौ.वैशाली सौंदाणकर सौ. अंजली देशमुख ,सौ.हर्षा महाजन,सौ. प्रतिभाताई पाटील, सौ.वंदना पाटील. उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन- प्रा. संजय नेवे ,व आभार- प्राचार्य, प्रा. सुनिल बारी ,चित्र मांडणी प्रा. विनोद पाटील, सहकार्य भगवान बारी, अतुल अडावदकर, प्रविण मानकरी यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने