ॲड.संजय जैन यांचा सत्कार आणि सन्मान

 ॲड.संजय जैन यांचा सत्कार आणि सन्मान 

चोपडा दि.२४(प्रतिनिधी)तालुक्याचे भूमिपुत्र आणि पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपती ॲड.संजय जैन यांची काही दिवसांपूर्वीच केंद्र शासनाच्या वतीने पुणे येथील विमानतळ आणि रेल्वे बोर्डाच्या सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली होती.या मानाच्या पदावर भाऊंची झालेली निवड चोपडा तालुक्यासाठी अभिमानाची असून,जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील यांनी संजय जैन यांचा चोपडा भेटीत सत्कार आणि सन्मान केला.

यावेळी जन शिक्षण संस्थान येथे चोपडा कॉंग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष संजीव सोनवणे,चोपडा कॉंग्रेस शहर अध्यक्ष नंदकिशोर सांगोरे,खरेदी विक्री संघ अध्यक्ष ललित बागुल,कॉंग्रेस किसान सेल अध्यक्ष शशिकांत साळूखें,घोड़गाव गावाचे माजी सरपंच दिलीप कोळी,आरिफ सिद्धिकी,रमाकांत सोनवणे,रमाकांत धनगर, माजी नगरसेवक गौतम छाजेड,संजय बोरसे या सर्वानी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने