चोपडा येथे भव्य कलश यात्रा

 चोपडा येथे भव्य कलश यात्रा

चोपडा,दि.२४ (प्रतिनिधी)गुराडीया येथील मां आशा पूर्णा मंदिर प्राण प्रतिष्ठा निमित्त पालीवाल समाज चोपडा तर्फे भव्य जलकलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मल्हार पूर्यातील आनंदी भवानी मंदिर परिसरात शेकडो पालीपुत्रांनी व महिला मंडळाच्या माता भगिनी, युवती व युवकांनी सहभागी होऊन वाजत गाजत यात्रा संपन्न केली. 

प्रसंगी माजी अध्यक्ष, विकास पालीवाल, ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत पालीवाल, अनिलकुमार पालीवाल, अध्यक्ष प्रदीप पालीवाल,सचिव विशाल पालीवाल, राजेंद्र पालीवाल सुनील पालीवाल, श्यामकांत पालीवाल, श्रीमती सुनीता पालीवाल,सौ. किरण पालीवाल, सौ. आशा पालीवाल, सौ. रेखा पालीवाल, मुकुंद पालीवाल, संतोष पालीवाल,आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशश्वीतेसाठी सर्वश्री अजय पालीवाल, मोनेश पालीवाल. सिद्धार्थ पालीवाल, सौमित्र पालीवाल, सौ. स्वाती पालीवाल, गिरीश पालीवाल, सौ. मोनल पालीवाल, आदीन्नी परिश्रम घेतले. मातेचे आरतीने व चहापानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने