राष्ट्रीयस्तर चित्रकला स्पर्धेत फडकला प्रतापचा झेंडा

 राष्ट्रीयस्तर चित्रकला स्पर्धेत  फडकला प्रतापचा झेंडा

चोपडा दि.१(प्रतिनिधी)रंगोत्सव सेलिब्रेशन नॅशनल ड्रॉइंग कॉम्पिटिशन  मुंबई आयोजित विविध कला प्रकारात १०६ वर्षापासून यशस्वी गगनभरारी घेणारी चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित, प्रताप विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.  या स्पर्धेत एकूण ८५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता त्यापैकी १०८ विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाली तसेच १०८ विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

सदर स्पर्धेत विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व ट्रस्टी यांना मिळून एकूण ११३ पारितोषिके व सन्मानपत्र मिळाली.त्यात १४ आकर्षक ट्रॉफी, ४४ गोल्ड मेडल,२७ सिल्वर मेडल,२० ब्रांझ मेडल,८ कन्सोलेशन प्राईस_ सरप्राईज गिफ्ट, ४ कलर सेट, २के जी ट्रॉफी व सरप्राईज गिफ्ट २ असे एकूण ११३ राष्ट्रीय स्तरीय पारितोषिकांचा मोठा जल्लोष झाला. प्रशालेतील उपप्राचार्य श्री.जे.एस.शेलार, पर्यवेक्षिका माधुरी पाटील, पर्यवेक्षक श्री.पी.डी.पाटील, श्री.एस.एस.पाटील, श्री.ए.एन.भट, माजी कलाशिक्षक श्री.ए.ए.गायकवाड सर, श्री.डी.टी.महाजन सर, पंचायत समिती  तज्ञशिक्षक श्री.युवराज पाटील सर, कलाशिक्षक व इव्हेंट डायरेक्टर पंकज नागपुरे ,कलाशिक्षक कमलेश गायकवाड, संगीत शिक्षक प्रदीप कोळी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या दिमाकदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्दू विभागाचे शिक्षक श्री.एजाज सर यांनी केले. या स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे  मुख्याध्यापक श्री.प्रशांत एस.गुजराथी ,संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, चेअरमन, सचिव व सर्व सभासद यांनी कौतुक केले.पर्यवेक्षक पी.डी.पाटील यांनी  त्यांच्या खास शैलीत मनोगत व्यक्त केले व  पालकांशी संवाद साधला व आभार मानले  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील श्री गिरीश महाजन,श्री व्ही.ए  गोसावी सर, शिपाई बंधू यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने