शिवकृपा कॉटस्पिनचे उद्घाटन ना.गिरीष महाजन यांच्या वरदहस्ते

 शिवकृपा कॉटस्पिनचे उद्घाटन ना.गिरीष महाजन यांच्या वरदहस्ते


चोपडा दि.३(प्रतिनिधी)शिवकृपा कॉटस्पिन प्रायव्हेट लिमिटेड उद्घाटन ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जळगाव जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल यांनी केले. प्रास्ताविक मध्ये गेल्या 100 वर्षापासून चोपडा तालुका कापसाचे आगार आहे. जिनिंग व्यवसाय हा फारच जुना आहे. शेजारील राज्यात चोरट्या मार्गाने कापसाची वाहतूक झाल्याने या जिनिंग उद्योगास घरघर आली. जिनर्स ने उद्योग बंद केले. 1997मध्ये युतीचे सरकार होते कापसाचे भाव वाढतील या आशेने उद्योग सुरु केला. 2002 मध्ये शासनाने खाजगी कापूस खरेदी करण्यास परवानगी दिल्याने आठ ते दहा जिनिंग सुरु झाल्यात. 2017 मध्ये स्वतःची कॉटन स्पिन उभी केली. 70 कोटीचा प्रोजेक्ट उभा केला. कुठलाही उद्योग तोट्यात नसतो ती आपली सवय असल्याचे यावेळी घनश्याम भाई अग्रवाल यांनी सांगितले

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री गुलाबराव पाटील तर व्यासपीठावर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, विधानसभा माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार किशोर पाटील,आमदार लताताई सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार डॉ बी एस पाटील, जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार, उमेश नेमाडे, माजी जी प सदस्य डॉ सुरेश पाटील, सुनिल अग्रवाल तसेच कोईम्बतूर येथील उद्योजक एम शंकरजी, स्टेट बँक मुबंई श्रीमती मैरीजी धनपाल, टी एम डी चे उद्योजक प्रदीप रॉय, उद्योजक श्रीकांत गजबी, नागेश्वर शर्मा मुंबई, अॅड घनश्याम पाटील, पंकज बोरोले जीवन चौधरी नंदकिशोर पाटील आशिष गुजराथी, डॉ सुरेश पाटील, सूनिल जैन, चंद्रशेखर पाटील, आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने