हरताळे येथे आपली वसुंधरा अभियान संपन्न

 हरताळे येथे आपली वसुंधरा अभियान संपन्न



मुक्ताईनगर,दि.७( प्रतिनिधी)श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयातील भूगोल विभागाद्वारे  मौजे हरताळा तालुका मुक्ताईनगर येथे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष हिवाळी शिबिर प्रसंगी आपली वसुंधरा अभियान संपन्न करण्यात आले. 


 राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीरार्थीना हरताळा वनउद्यान येथे सकाळच्या सत्रात क्षेत्रभ्यासाच्या दरम्यान भूगोल विभागातील प्रा. राजन खेडकर यांनी भूगोल व पर्यावरण या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून आणि मानव व निसर्ग यांचा सहसंबंध स्पष्ट करीत  आपल्या वसुंधरेचे संवर्धन करण्यास स्वयंसेवकांना प्रेरित केले.  तर दुपारच्या सत्रात प्रा. एस. एन. पाटील यांनी जि. प. प्राथमिक शाळा, हरताळे या शिबिर स्थळी आपली वसुंधरा अभियान या विषयावर मार्गदर्शन करून समृद्ध वसुंधरेच्या रक्षणाकरिता आपल्या प्रत्येकाचे योगदान असणे काळाची गरज आहे तेव्हाच वसुदैव कुटुंबकम ही संकल्पना शाश्वत होईल असे प्रतिपादन केले. 

या अभियानाचे संपूर्ण संयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन, उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील व उपप्राचार्य डॉ.राजेंद्र चौधरी   यांनी केले. तर या अभियानाचे आयोजन भूगोल विभाग प्रमुख प्रा. प्रभाकर पितांबर लढे यांनी केले. या अभियाानाचे समन्वयक म्हणून एन एस एस कार्यक्रमाधिकारी प्रा.विजय डांगे तर सहसमन्वयक प्रा. डॉ. अतुल ब़ढे यांनी कार्य केले. आपली वसुंधरा अभियान यशस्वी होण्याकरिता एनएसएस सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.दीपक बावस्कर प्रा. डॉ. ताहिरा मीर व वाणिज्य शाखेचे विभागप्रमुख प्राध्यापक खडसे यांनी अनमोल सहकार्य केले. या अभियानात राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सुमारे 120 स्वयंसेवक सहभागी झालेले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने