प्रताप विद्या मंदिरात रंगला सरोद वादनाचा कार्यक्रम

 प्रताप विद्या मंदिरात रंगला सरोद वादनाचा कार्यक्रम


चोपडा,दि.१९(प्रतिनिधी) एज्युकेशन सोसायटी चोपडा संचलित संस्थेच्या चार विभागात  संगीत कलादालन व SPIC MACAY यांच्या संयुक्त विद्यमाने ' सरोद वादन ' हा संगीत विषयाचा चा सुश्राव्य कार्यक्रम शुक्रवार 17/2/2024 व 18/2 /2024 रोजी उत्साहात संपन्न झाला. सरोद वादक श्री. अबीर हुसेन व तबलावादक श्री . टि. बंडोपाध्याय यांचे सुश्राव्य सादरीकरण झाले. संस्थेच्या सचिव आ. माधूरीताई मयूर यांचे हस्ते मुख्य अतिथींचे स्वागत व सत्कार  करण्यात आला. संस्थेचे समन्वयक श्री.गोविंद गुजराथी यांचे सहकार्य लाभले

या कार्यक्रमास  मुख्याध्यापक श्री. पी. एस गुजराथी, उपप्राचार्य श्री. जे.एस. शेलार , पर्यवेक्षक श्री. आप्पा पाटील सर, श्री पी. डी .पाटील सर, श्रीमती माधुरी पाटील मॅडम, श्री. ए.एन.भट , पी. व्ही. एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रिन्सिपल श्री. रजिश बालन, नागलवाडी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर . बी. पाटील सर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमात श्री योगेश मयूर व प्रवीण भाई गुजराती उपस्थित होते.गावातील अनेक मान्यवरांनी या संगीत कार्यक्रमास उपस्थिती दिली. 




प्रत्येक विभागात सुत्रसंचालन करणारे शिक्षक बंधू-भगिनी. पी .व्ही .एम. इंग्लिश मीडियम येथे श्रीमती. चेतना बडगुजर मॅडम, प्रताप विद्या मंदिर , मुख्य इमारत येथे श्री. एच .व्ही. आहूजा सर,नागलवाडी माध्यमिक विद्यालय येथे श्री. नवनीत राजपूत सर,गावातील विभागात श्री .किरण पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी त्या त्या शाळेतील माननीय मुख्याध्यापक व सर्व अधिकारी व सर्व शिक्षक बंधू भगिनी शिपाई बंधू कर्मचारी सर्वांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील प्रश्न विचारले . मान्यवरांनी दिलखुलास उत्तरे दिली. जणूकाही दिडतास संगीतमय मेजवानीच होती. या कार्यक्रमाचे आयोजन स्पीक_ मेकचे चोपडा, तालुक्यातील वॉलेंटियर प्रताप विद्या मंदिराचे संगीत शिक्षक, श्री .प्रदिप कोळी सर यांनी केले . या संगीत विषयाच्या कार्यक्रमासाठी कलाशिक्षक  श्री. पंकज नागपुरे, कलाशिक्षक  श्री.कमलेश गायकवाड यांनी  सहकार्य केले. विद्यार्थ्यांमध्ये कलेबद्दल जागृती निर्माण व्हावी व कले प्रती आदर निर्माण व्हावा या दृष्टीने स्पीक मेक दिल्ली व प्रताप विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम उत्कृष्टपणे सर्व विभागात सादर झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने