विद्यार्थी मयूर ठाकरे याचे अपघाती निधन विद्यापीठाकडून पाच लाख रुपयाचा धनादेश आई-वडिलांना प्रदान

 

विद्यार्थी मयूर ठाकरे याचे अपघाती निधन विद्यापीठाकडून   पाच लाख रुपयाचा धनादेश  आई-वडिलांना प्रदान

भडगाव दि.१०(प्रतिनिधी):येथील सौ.र.ना. देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा टी. वाय.बी.एस्सी.या वर्गाचा विद्यार्थी मयूर ठाकरे याचे अपघाती निधन झाल्यामुळे त्याचे वडील नरेंद्रसिंग ठाकरे व आई सौ. रेखा ठाकरे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी सामूहिक सुरक्षा अपघात योजने अंतर्गत रु. पाच लाख रुपयाचा धनादेश तसेच मा. कुलगुरू महोदय यांच्या वैद्यकिय मदत निधीतून रु. १० हजार रुपयाचा धनादेश संस्थेचे चेअरमन संजय वाघ, कबचौउमविचे व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड.अमोल नाना पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.   महाविद्यालयाच्या विदयार्थी विकास विभागातर्फे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.दीपक मराठे, सहाय्यक अधिकारी प्रा.शिवाजी पाटील, महिला अधिकारी श्रीमती चित्रा पाटील यांनी विद्यापीठामार्फत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कडे विम्याचा दावा सादर केला होता.सदर प्रस्तावाचा पाठपुरावा व संबंधित कागदपत्रे विमा कंपनीस सादर करून हा दावा मंजूर करून घेतला.

         क.ब.चौ.उ.म.वि.च्या विद्यार्थी विकास विभागातर्फे प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सामूहिक सुरक्षा अपघात विमा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कडून काढला जातो. विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांचे अपघाती निधन झाल्यास त्याच्या वारसादारास पाच लाख रु. दिले जातात.

      याप्रसंगी चेअरमन संजय वाघ व ॲड. अमोल पाटील यांनी अपघात ग्रस्त पालकांच्या दुःखात मा.कुलगुरूमहोदय,विद्यापीठ व संस्था सहभागी आहे व भविष्यात देखील त्यांच्या पालकांना संस्थेतर्फे मदत केली जाईल असे आश्वासित केले. याप्रसंगी संस्थेचे व्हॉइस चेअरमन व सिनेट सदस्य नानासोा व्ही.टी.जोशी, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य नानासाहेब देशमुख, प्राचार्य डॉ.एन.एन.गायकवाड, प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य एस.आर. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. दीपक मराठे, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. देवरे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने